जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार स्त्रियांना आता स्तनपानाचे महत्त्व पटू लागले आहे. स्तनपान करणाऱ्या स्त्रियांच्या संख्येत वाढ झाली आहे; पण अंगावर पाजणाच्या कालावधीत वाढ झालेली नाही. त्या पाजणे लवकर बंद करतात. ९६ टक्के स्त्रिया स्तनपानाला सुरुवात करतात. ११ स्त्रिया ४ ते ६ महिने अंगावर पाजतात. फक्त १४ टक्के स्त्रिया पूर्णपणे २ | वर्षे स्तनपान करतात. ‘बेबी फ्रेंडली’ […]
अंगावरच्या दुधातील सुरुवातीचे दूध बाळाची तहान भागवते तर नंतर येणारे दूध भूक भागवते. सुरुवातीच्या ८ ते १० मिनिटांत येणाऱ्या दुधांत मेद कमी असते व पाणी जास्त असते. त्यात दुग्धशर्करा, प्रथिने जीवनसत्त्वे व खनिजे जास्त प्रमाणात असतात. नंतरच्या दुधात चरबीचे प्रमाण वाढते बाळाची भूक भागते. बाळाला ऊर्जा मिळते. यामुळे सर्व घटक मिळण्यासाठी एका बाजूचे स्तन पूर्णपणे रिक्त […]
नवजात बालकाला पहिल्या १/२ ते १ तासांत स्तनपान करावे. पहिल्या ७२ तासांत येणारे दूध-चीक (कोलोस्ट्रम) हे घट्ट, चिकट व पिवळसर असते. सुरुवातीचे ३० ते ९० मि.मि. दूध नवजात बाळाला पुरेसे असते. यामध्ये प्रथिने आणि ‘अ’ व ‘के’ जीवनसत्त्व अधिक प्रमाणात असतात. जन्मतःच कमी प्रतिकारशक्ती असलेल्या बालकाला यातून प्रतिकारशक्ती मिळते. त्यातील ‘इम्युन्योग्लोबिन्स’ बाळाच्या आतड्याच्या अंतःत्वचेवर पसरतात. त्यामुळे […]
उत्क्रांतीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे सस्तन प्राणी. सस्तन प्राण्यातील स्तनपान ही निसर्गाची किमया आहे. लालभडक रक्तापासून पांढरेशुभ्र दूध तयार करणे आणि तेही थोडक्या वेळात, गरजेनुसार बदलणाऱ्या घटकांच्या प्रमाणात हे एक अनाकलनीय सत्य आहे. उच्चभ्रू समाजातील भ्रामक कल्पनांपैकी एक म्हणजे बाळंतपणानंतर मुलाला पाजणे ही जुन्या जमान्यातील गावठी पद्धत! बाळाच्या आरोग्यापेक्षा | स्वतःच्या शरीरसौष्ठवाला महत्त्व जास्त. स्तन ही […]
क्ष-किरणांचा शोध १८९५ साली लावला. त्यानंतर या शास्त्राची घोडदौड | जोरात सुरू झाली. आज क्ष-किरणशास्त्र रेडिओलॉजी हे फक्त क्ष-किरणांनी काढलेल्या प्रतिमेपुरते मर्यादित राहिले नाही तर निरनिराळ्या पद्धतींनी काढलेल्या प्रतिमा बघून निष्कर्ष काढण्याचे शास्त्र झाले आहे. क्ष-किरण, अल्ट्रासाऊंड लहरी, चुंबकीय लहरी, इन्फ्रारेड लहरी इत्यादी लहरींनी काढलेल्या प्रतिमा यामध्ये सामावल्या जातात. बऱ्याच तपासण्यांमध्ये शरीराबाहेरून सोडलेल्या तरंगांमुळे निर्माण झालेल्या […]
घर्षण करणाऱ्यांनी कोणते नियम पाळावेत- अर्थात घर्षण नेहमी लाकडाच्या पाटावर, खुर्चीवर किंवा पलंगावर बसून किंवा उभे राहून करावे. मात्र बसण्यासाठी वा उभे राहण्यासाठी वापरलेली वस्तू ही धातूची असू नये. कारण धातू हे विद्युतवाहक असल्याने घर्षणासाठी निर्माण होणारी वीज जमिनीत निघून जाईल व घर्षणाचा फायदा होणार नाही, तसेच घर्षणाच्या वेळी जी वीज निर्माण होते तिचा शरीराच्या आरोग्यसंपन्नतेच्या […]
आपण व्यवहारात रेशमी वस्त्रे, लोकरीची वस्त्रे, सोन्या-चांदीचे अलंकार इत्यादींचा वापर करीत असतो. त्यांच्या परिधानांमुळे होणाऱ्या घर्षणाने नकळत त्यांचे फायदेही मिळत असतात; परंतु त्याचा जाणीवपूर्वक विचार केला जात नाही, तो करणे अत्यंत आवश्यक असते. उदा. रेशमी वस्त्र परिधान केल्यामुळे स्वाभाविकपणे शरीराच्या हालचालींबरोबर शरीरामध्ये घर्षण निर्माण, वीज निर्माण होते व त्याचा रक्ताभिसरण क्रियेला उपयोग होतो. रेशमी वस्त्राचा स्पर्श […]
घर्षण किती वेळ करावे: सर्वांग घर्षणाची सुरुवात कराल तेव्हा पहिले आठ दिवस प्रत्येक अवयवाला दररोज पाच वेळा घर्षण करावे. नंतरच्या आठवड्यात प्रत्येक अवयवाला दररोज दहा वेळा घर्षण करावे. नंतर दर आठवड्यात घर्षणाची संख्या पाचाने वाढवावी. शेवटी पंचवीसपर्यंत आणावी. नंतर प्रत्येक अवयवाला दररोज पंचवीस वेळा घर्षण करावे. (घर्षण संपले, की सुरुवातीला एक मिनिट तरी विश्रांती घ्यावी.) घर्षण […]
केस विंचरताना जेव्हा कंगव्यात भरभरून केसांचा गुंता येतो किंवा जमिनीवर असंख्य वाटणारे केस पडलेले दिसतात, हे दृष्य नकोसं वाटतं. सुंदर, दाट, केशसंभाराने सौंदर्य आणि | व्यक्तिमत्त्व खुलून. मात्र गळणारे केस केवळ सौंदर्यावरच नव्हे तर मानसिक स्वास्थ्यावरही घाला घालणारे ठरू शकतात आणि त्याचे सामाजिक परिणामही दिसून येऊ शकतात. डोक्यावरील ९० टक्के केस वाढत असतात आणि १० टक्के […]
विज्ञानाने सामान्य माणसाचे जीवन अनेकविध प्रकारच्या सोयींनी समृद्ध केलेले आहे. झपाट्याने औद्योगिकीकरण होत आहे. त्यात उद्योजकांच्या आपापसातल्या स्पर्धांचा गाजावाजा झाल्यामुळे मानवी जीवन अधिकाधिक प्रदूषणग्रस्त, ताणतणावपूर्ण व मानसिकदृष्ट्या अस्वास्थ्यकारक झाले आहे. हवा आणि पाण्यातले वाढते प्रदूषण आणि जगण्यातील अनियमितता, पोषण तत्त्वांचा अभाव असलेल्या ब्रेड-बिस्किटे इ. पदार्थांची ओढ, परिणामतः आधुनिक मानवाची ‘प्रतिकारक्षमता’ अत्यंत कमी होऊन मधुमेह, सोरायसिससारखे त्वचाविकार, […]