‘सबस्टॅण्डर्ड’ आणि ‘सेकण्डस्’ असे शिक्के त्या कापडाच्या प्रत्येक मीटरवर मारलेले असतात. ते बघून त्यानुसार त्याला दर देणे जागरुक ग्राहकाचे लक्षण आहे. अन्यथा व्यापाऱ्यांकडून याबाबतीत सर्रास फसवणूक होते […]
लहान मुलांच्या दातांची निगा राखणं खूप महत्त्वाचं आणि आवश्यक आहे. लहान मुलांच्या दातांना दुधाचे दात किंवा प्राथमिक दात असे म्हणतात. अती गोड व स्निग्ध पदार्थ उदा. चॉकलेट, बिस्किटं फास्ट फूड, आईस्क्रीम हे खाण्याचं प्रमाण मुलांमध्ये जास्ती असेल तर किडण्याचे प्रमाण अधिक आढळते. अशा पदार्थांमध्ये कार्बोहायर्डेट जास्ती असते. ते दाताला चिकटले आणि किडण्याचे प्रमाण वाढते. साधारणपणे सातव्या […]
कापड निर्मिती करताना त्याचा वापर कशाकरिता करावयाचा आहे, त्याचे महत्व प्रथम लक्षात घेतले जाते. त्याकरिता वापरले जाणारे तंतू, त्याचे सूतांक, ताणा-बाण्याची घनता अशा सर्व तांत्रिक बाबी ध्यानात ठेवल्या जातात. […]
हा सांधा खूपच गुंतागुंतीचा आहे. कारण माणसाला आपल्या हाताची निरनिराळी निपुण हालचाल करण्यासाठी या सांध्याचा उपयोग होतो. मनगटाजवळ ३६०० वर्तुळाकार हालचाली झाल्याने हात उलथा आणि पालथा होऊ शकतो. तसेच हातात काहीही पकडण्यासाठी ४५० वरच्या बाजूला व एखादी गोष्ट टेबलवरून उचलण्यासाठी २५-३०० हात खाकी- या सांध्यातून आपल्याला हलविता येतो अशा रितीने हाताच्या सर्व निपुण हालचाली होण्यासाठी मनगटाचा […]
धातूंचे आणि त्यांच्या संमिश्रांचे जे अगणित उपयोग आहेत त्यातील काही माणसाच्या शरीरातदेखील केले जातात. दातांमध्ये भरण्यासाठी वापरली जाणारी चांदी किंवा मोडलेल्या हाडांना जोडण्यासाठी आणि आधार | देण्यासाठी धातूंच्या पट्ट्यांचा उपयोग केला जातो. किडलेले दात स्वच्छ करताना, कीड लागलेला दाताचा भाग काढून टाकला . की दातांत एक पोकळी उरते. ही पोकळी भरून काढली नाही तर त्यात अन्नकण […]
नवीन सुती कापड खरेदी करुन आणले आणि त्या कोऱ्या कापडापासून कपडे शिवले तर पहिल्यावेळी कपडे धुतल्यानंतर ते आपल्याला आटलेले आढळतात, उंचीला कमी होतात असा अनुभव येतो याचे कारण काय असेल याचा शोध घ्यायचा, तर थोडी कापडनिर्मितीची प्रक्रिया समजून घ्यावी लागेल. […]
हा एक चयापचयाचा रोग आहे. यात हाडाची घनता कमी होते व बाह्यकाची जाडी कमी होते. हाडाची झीज आणि भर ही सतत चालणारी प्रक्रिया असते. तिशीपर्यंत हाडाचा बाह्यक (कॉर्टेक्स) कठीण होत जातो. नंतर हाडाची झीज व भर समतोल झाल्यास हाडाचा कठीणपणा तसाच राहतो; पण त्यात, तफावत पडून झीज जास्त झाली तर हाडात सच्छिद्रता येऊन कठीणपणा कमी होतो. […]
आपल्या एकुलत्या एक लेकीचा पाचवा वाढदिवस त्याला अगदी जंगी साजरा करायचा होता. एका हॉल मध्ये सगळ्याचं कंत्राटच दिलं होतं. रंगीबेरंगी फुगे, कार्टूनची सजावट, एका कोपऱ्यात टॅटू काढणारा, एक जण वेगवेगळे मास्क वाटणारा वगैरे वगैरे जय्यत तयारी केली होती. हळूहळू पाहुणे येऊ लागले. भेटीगाठी-गप्पा सुरू झाल्या. थोड्यावेळाने बहुतांश निमंत्रित आले आणि त्याने तिथल्या व्यवस्थापन करणाऱ्याला कार्यक्रम सुरू […]
खेळून आल्यावर साबणाने हात-पाय स्वच्छ धू.’ असं संध्याकाळच्या वेळी प्रत्येक घरात आईचं हे वाक्य ऐकायला मिळतं. अस्वच्छ हात-पाय फक्त पाण्याने स्वच्छ होत नाहीत. त्यासाठी साबण वापरावा लागतो. कसं बरं तयार करतात साबण? अल्कली मोनोकार्बोक्सिलिक आम्ल (फॅटी अॅसिड) यामध्ये अभिक्रिया होऊन साबण आणि ग्लिसरीन तयार होतं. […]