नवीन लेखन...

आपल्याला अनेक बाबतीत कुतुहल असतं. अशा प्रश्नांची उत्तरं देणारं हे सदर

मृदू, कठीण, जड पाणी

कठीण पाणी, जड पाणी असे अनेक शब्द आपल्या ऐकिवात आहेत. आज त्यांची माहिती करून घेऊ. पावसाचे पाणी जमिनीतून झिरपताना पाण्यात कॅल्शिअम, मॅन्गनीज (Ca2+, Mg2+) इत्यादी द्विभारीत धातूंचे क्लोराईड, सल्फेट, बायकार्बोनेट आदी क्षार पाण्यात विरघळतात. अशा पाण्याला क्षारयुक्त कठीण पाणी म्हणतात. ज्यात असे क्षार नगण्य प्रमाणात असतात ते मृदू पाणी. सोडिअमचे क्षार असल्यास मात्र पाण्याला कठीणपणा प्राप्त होत नाही. […]

कृत्रिम वंगणे

कृत्रिम वंगणतेले ही संश्लेषित स्वरूपाची रसायने असतात. विशेष म्हणजे, ती वंगण-गुण नसलेल्या रसायनांपासून तयार करतात. ती सहसा पेटत नाहीत की गोठत नाहीत, त्यामुळे ती फार मोठ्या तापमानाच्या कक्षेत कार्यरत शकतात. द्रावणीयता राहू विष्यदंता (व्हिस्कोसिटी), अग्निरोधकता (फायर रिटाईंसी), अपायकारकता (टॉक्सिसिटी) इत्यादी बाबतीत कृत्रिम वंगणतेले खनिज वंगणतेलांपेक्षा कांकणभर सरस असतात. सिंथेटिक हायड्रोकार्बस, ऑरगॅनिक इस्टर्स, पोलिग्लायकॉल इथर्स, सिलिकाँस, सिलाँस, परफ्लुरोइथर्स, क्लोरोफ्लुरो कार्बंस हे वंगणतेलांचे काही प्रकार. […]

काळी इंधने

काही इंधने रंगाने काळसर असतात, म्हणून त्यास ‘काळी तेले’ (ब्लॅक ऑइल) असे म्हटले जाते. पेट्रोलियम खनिज तेलाचे उर्ध्वपातन होताना न उकळणारा जो अवशिष्ट भाग उरतो, त्याचाही इंधन म्हणून वापर करता येतो. खनिज तेलाच्या काही उर्ध्वपातित भागात या अवशिष्ट भागाचा अंश मिसळून जे इंधन तयार होते त्याला एलडीओ (Light Diesel Oil) म्हणतात. […]

विमानाचे इंधन

आकाशातून झेप घेत जाणाऱ्या विमानाचे आता फारसे कौतुक उरलेले नाही. ढगांशी लपाछपी खेळत, निळ्या गगनातून विहार करणारे हे हवाईजहाज ताशी ९५० कि.मी. या प्रचंड वेगाने प्रवास करते. जमिनीपासून दहा हजार मीटर उंचीवरून तरंगत जाणारे विमान म्हणजे एक वैज्ञानिक चमत्कार होय. […]

पेट्रोलियम द्रावणे

पेट्रोलियम खनिज तेलापासून मिळणाऱ्या पदार्थांमध्ये हायड्रोकार्बन द्रावणांचा महत्त्वपूर्ण वाटा असतो. कमी तापमानाला ऊर्ध्वपातित होणारी ही द्रावणे इतर पेट्रोलियम पदार्थांप्रमाणे एरॉमेटिक, पॅराफिनिक व नॅफ्थोनिक हायड्रोकार्बन रसायनांची मिश्रणे असतात, तर काही द्रावणे एकाच विशिष्ट प्रकारच्या हायड्रोकार्बन्सने युक्त असतात. साधारणतः पाण्यासारखी रंगहीन दिसणारी ही द्रावणे पाण्यात अविद्राव्य असतात. […]

पेट्रोलियम: खनिज तेले

हायड्रोजन आणि कार्बन या मूलद्रव्यांचे अणू संयोग पावून ‘हायड्रोकार्बन’ रसायने तयार होतात. नाना तऱ्हेच्या हायड्रोकार्बन्स रसायनांची संख्या प्रचंड असून त्यांच्यापासून रसायन शास्त्रात एक वेगळा विभाग तयार. होतो. पेट्रोलियम पदार्थ हे या भिन्न हायड्रोकार्बन संयुगाच्या मिश्रणांनी बनलेले असतात. त्या संयुगातील कार्बनची संख्या जेवढी जास्त त्यावरून त्यापासून मिळणाऱ्या पदार्थांची वर्गवारी केली जाते. […]

मीठ

समुद्राचं पाणी छोट्या वाफ्यांमध्ये जमा करून सूर्यप्रकाश व वारा यांच्या साहाय्याने त्याचं बाष्पीभवन केलं जातं. सर्व पाणी निघून गेलं की खाली जाड मीठ उरतं. पूर्वी असं मीठ खडे मीठ म्हणून विकल जाई. समुद्राच्या पाण्यात फक्त सोडियम क्लोराइडच नाहीतर मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम यांची संयुगेही अल्प प्रमाणात असतात. […]

घरगुती इंधनवायू (एल.पी.जी.)

एल.पी.जी. म्हणजेच ‘लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस’ होय. याचाच अर्थ, द्रवात रूपांतर केलेला वायू होय. हा गॅस प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन या हायड्रोकार्बन रसायनांनी युक्त असतो. […]

काळे सोने’

पेट्रोलियम खनिज तेलाचा रंग व स्वरूप पाहता, त्याला ‘काळे सोने’ असे संबोधिले जाते. त्याची वाढती गरज लक्षात घेता, वास्तविक ते औद्योगिक क्षेत्राला ‘जीवन देणारे रक्त’ असं म्हटल्यास वावगे न ठरो. फार फार जुन्या काळापासून प्राणी व वनस्पतींच्या जमिनीत गाडल्या गेलेल्या अवशेषातून हायड्रोकार्बन तेले निर्माण झाली व ती जमिनीत तसेच समुद्राच्या तळाशी काळ्या जाडसर तेलाच्या स्वरूपात साचली गेली. […]

बिनशिशाचे पेट्रोल

मुळात, पेट्रोल रंगहीन असते व पाण्यासारखे दिसते. पण अन्य पेट्रोलियम पदार्थांपासून त्याची सहज ओळख पटावी म्हणून त्यात नारिंगी रंग मिसळला जातो. उच्च ज्वलनक्षमतेच्या पेट्रोलला लाल रंग दिला जातो, तर लष्करात वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट पेट्रोलला निळा रंग असतो. […]

1 22 23 24 25 26 33
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..