बरीचशी वैद्यकीय व इतर महत्त्वाची रसायने किण्वन (फर्मेंटेशन) क्रियेने बनवली जातात. प्रतिजीवके (एन्टीबॉडीज), संप्रेरके (हार्मोन्स) ही जीवाणूकृत किण्वन क्रियेने बनवली जाणारी महत्त्वाची रसायने. आपण जीवाणूंच्या पेशीमध्ये विकरांच्या (एन्झाइम्स) साहाय्याने कच्च्या मालाचे तयार मालात स्थित्यंतर घडवून आणत असतो. […]
पुदिन्याच्या तेलातील मेंथॉल आणि मेंथाईल अॅसिटेट यांमुळे पुदिन्याला तीव्र वास येतो. मँगनीज, तांबे आणि जीवनसत्त्व ‘क’ यांचा पुदिना हा उत्तम स्रोत आहे. याशिवाय पुदिन्यात इतर बाष्पनशील तेलेही असतात. पुदिन्यामुळे कॅन्सरची, विशेषतः जठराच्या कॅन्सरची संभाव्यता कमी होते. मेंथॉल हे एक कार्बनी संयुग आहे. ते पाण्यात विरघळत नाही, पण अल्कोहोल आणि इथरमध्ये विरघळतं. […]
ॲक्रिलोनायट्रिल ब्युटाडाइन स्टायरिन या मिश्र प्लास्टिकचा शोध १९४८ साली यामध्ये असलेल्या लागला. अॅक्रिलोनायट्रीलमुळे त्याला उच्च ताण सहन करण्याची शक्ती, रसायनांना विरोध करण्याची शक्ती व उष्णतेला टिकून राहण्याची शक्ती हे गुणधर्म प्राप्त झाले. यामध्ये आलेल्या ब्युटाडाइन या रबरामुळे त्याची आघात सहन करण्याची शक्ती व मजबुती वाढली व स्टायरिन या घटकद्रव्यामुळे प्लास्टिक अधिक चकचकीत दिसते आणि त्यापासून वस्तू बनवणे सोपे झाले. […]
प्लास्टिकच्या डब्यात खायचे पदार्थ किंवा औषधे ठेवली तर ती शरीराला अपायकारक ठरतात का? हा प्रश्न वारंवार विचारला जातो. असे डबे पॉलिथिलिनपासून बनवले जातात. पॉलिथिलिन दोन प्रकारे बनवले जाते. हे दोन्ही प्रकार मुळात बिनविषारी प्रकारात मोडतात. पॉलिथिलिनचा मानवी शरीरावर अजिबात परिणाम होत नाही हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. पॉलिथिलिन हे एकमेव प्लास्टिक असे आहे की, ज्यावर कोणत्याही द्रावकाचा (सॉल्व्हंट) परिणाम होत नाही. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर पॉलिथिलिन कोणत्याही द्रावात विरघळत नाही. […]
इथिलीन ऑक्साइड व हायड्रोजन साइनाइड यांपासून अॅक्रिलोनायट्रिल बनते. त्यात स्टायरिन मिसळून स्टायनि अॅक्रिलोनायट्रिल बनवता येते. हे मिश्र प्लास्टिक पिवळसर असते. हे पूर्णपणे पारदर्शक असते. […]
डांबर ऊर्फ बिटुमीन जुन्या काळापासून इजिप्शियन लोकांना माहीत होते. त्यांच्या लाकडी जहाजांची पाण्यामुळे नासधूस होऊ नये म्हणून ते डांबराचा थर जहाजांवर देत. लाख हे एक प्रकारचे प्लास्टिकच. ही लाख मानवाला फार पूर्वीपासून माहीत आहे. […]
पूर्ण जीवसृष्टीची ही डीएनएची गाथा लिहिली जाते ती फक्त ४ मुळाक्षरांनी (A, T, G, C). पण आपल्या साहित्यसृष्टीत फक्त ३६ मराठी मुळाक्षरांनी लिहिलेले प्रत्येक पुस्तक वेगळे असते तशीच प्रत्येक जीवाची अशी एक खास गाथा या डीएनएवर आलेखलेली असते. शेवटी जीव म्हणजे काय तर अनेक प्रथिने, मेद आणि कर्बोदकांची एक पेशी. प्रत्येक पेशीतील महत्त्वाची कामे केली जातात मूलतः ती वेगवेगळ्या प्रथिनांद्वारे. चयापचयासाठी लागतात ती विकरे, सजीवाची वाढ अवलंबून असते ती हॉर्मोन्स ही सर्व प्रथिनेच असतात. […]
डीएनएमध्ये असलेले प्युरीन आणि, पिरिमिडीन बेसेस डीऑक्सिरायबोज साखर आणि प्रथिनांच्या पचनातून मिळणाऱ्या अमिनो आम्लांपासून बनतात. यातील ॲडेनीन, रायबोज साखरेबरोबर अँडिनोसिनचा रेणू बनवितो. अँडिनोसिन फॉस्फेटशी बंध तयार करून असे काही रेणू बनवितो ज्यात विविध प्रक्रियांसाठी लागणारी उष्मांक शक्ती सामावलेली असते. […]
आपल्या पेशीतीलं सर्व जैविक, जैवरसायनिक आणि रासायनिक प्रक्रियांचे नियंत्रण करणारा रेणू म्हणजे ‘डीएनए’ पेशीत असणाऱ्या केंद्रकात हा महारेणू सामावलेला असतो. खरे तर डीएनए एकच रेणू नसून अनेक रेणू एककांची एक भलीमोठी साखळी असते. आणि यातील प्रत्येक एकक (म्हणजे प्रत्येक मणी) चार वेगवेगळ्या रेणूंचा बनलेला असतो. […]
व्यवहारात सर्वसामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकमध्ये लो डेन्सिटी पॉलिथिलिन (एलडीपीई), हाय डेन्सिटी पॉलिथिलिन पॉलिव्हीनाइल क्लोराईड, पॉलिकार्बोनेट पॉलिस्टायरीन (पीएस), पॉलियुरेथीन (पीयू), पॉलिलीप्रॉपीलीन (पीपी), पॉलिथिलीन-टेरेथेलेट (पेट) हे प्रकार येतात. अनेक पॉलिमरमध्ये कार्बन आणि हायड्रोजन असतो. पीव्हीसीमध्ये क्लोरीन असतो. नायलॉनमध्ये नायट्रोजन असतो. […]