माती वाहून लुप्त होते, त्याला आपण जमिनीची धूप झाली असे म्हणतो. धूप होत असलेली जमीन अनुत्पादक होत होत शेवटी वांझ बनते. ज्या गतीने निसर्गात जमीन तयार होते. त्यापेक्षा ती खराब होण्याची गती जास्त होते तेव्हा त्या जमिनीवर अवलंबून असलेली जीवनसृष्टी धोक्यात येते. […]
पाणी जीवनामृत आहे. वनस्पती आणि प्राण्यांच्या शरीरक्रिया पाण्यामुळेच शक्य होतात. मनुष्याच्या आणि काही प्राण्यांच्या शरीरात ७० टक्के पाणी असते. टोमॅटो, कलिंगड या पिकात तर त्याहून जास्त पाणी असते. ताण बसून कोमेजणाऱ्या झाडांना पाणी दिले की, ते तरारते. म्हणूनच म्हणतात, ‘ए फर्टाइल लॅण्ड विदाऊट वॉटर इज देझर्ट. […]
ठिबक सिंचन ही अत्याधुनिक सिंचनप्रणाली आहे. झाडाच्या मुळाशी थेंब थेंब पाणी देऊन अगदी कमी पाण्यात पीक पोषण करण्याच्या पद्धतील ठिबक पद्धत म्हणतात. पारंपरिक पद्धतीपेक्षा ठिबक सिंचन पद्धतीमुळे अडीच ते तीनपट जास्त क्षेत्रावर सिंचन होते म्हणून शेती शास्त्रातला हा एक चमत्कार समजला जातो. […]
भारतीयांना सिंचनाची कला अनादीकालापासून ज्ञात आहे. जे ज्ञात आहे, त्यात कालमानपरत्वे सुधारणा मात्र झाल्या नाहीत. कधी काळी विकसित झालेल्या पद्धती परंपरेचा भाग बनून अढळ ताऱ्याप्रमाणे निश्चल झाल्या. […]
तरुण मुलं जेव्हा खूप खेळ खेळू लागतात तेव्हा आपल्या दोन्ही खांद्यांची भरपूर हालचाल करू लागतात. कोणताही खेळ असो- क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस तसेच कबड्डी, व्हॉलीबॉल, जिम्नॅस्टिक्स, वजन उचलणे, थ्रो बॉल या सर्वच खेळात खांद्यावर फारच ताण पडतो. उलट्या-सुलट्या उड्या -मारणे, हातावर जोर देऊन काम करणे यात खांद्याला इजा होऊ शकते. खांद्याच्या हाडाला जरी फ्रॅक्टर झाले नाही तरी […]
खरे पाहिले असता हृदय हा एक स्पंदक (पंप) नसून एका आवरणांमध्ये गुंडाळलेला डावा व उजवा असे दोन स्पंदक आहेत. ते एका पडद्याने विभागलेले असतात त्यामुळे त्यातील रक्त एकमेकांत मिसळत नाही. या प्रत्येक स्पंदकामध्ये दोन कप्पे असतात. डावा स्पंदक शरीरामध्ये शुद्ध रक्त पसरतो व सर्व अवयवांना रक्ताद्वारे प्राणवायू व इतर पोषक द्रव्ये पुरवितो. उजवा स्पंदक सर्व शरीरातून […]
मूत्रपिंडांच्या धमन्यांत थर साचल्यास मूत्रपिंडाचे कार्य मंदावते. धमनीचित्रण करून स्टेण्ट टाकल्यावर (रक्तप्रवाह सुरळीत होऊन कार्य पूर्ववत चालू होते. मूत्रपिंडे बिघडल्यास अपोहन (डायलिसीस) व शेवटी प्रतिरोपणाचा पर्याय असतो. शरीरातील स्नायू ताठरतात व हालचालींचा वेग मंदावतो. सांधेपण आखडतात व दुखतात. व्यायामाने स्नायू व सांधे सुटतात म्हणून व्यायाम महत्त्वाचा. जवळचे बघायला चाळीशीनंतर त्रास होतो. चष्म्याने दृष्टी सुधारते; पण तो […]
कर्करोग हा छुपा रोग आहे. त्याच्या पेशींची वाढ होऊन कर्करोगाची गाठ तयार होण्यास कित्येक वर्षे लागतात. या अतिपूर्व स्थितीत माणसाला कोणताही त्रास जाणवत नाही; परंतु एक दिवस त्याला शारीरिक अडचण जाणवते व डॉक्टरांकडे जावे लागते. कर्करोगाच्या पूर्वस्थितीत कर्करोगांच्या पेशींची थोडीफार वाढ तयार झाल्यानंतरच हा रोग त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. त्यामुळे कर्करोग झाला आहे किंवा तो […]
कर्करोग हा साथीच्या रोगांसारखा किंवा सर्दी-पडशासारखा सर्वांना होणारा रोग नसल्याने तो क्वचितच एखाद्यास होतो; पण कधी कधी एखाद्या कुटुंबातील एकाच पिढीतील किंवा वेगवेगळ्या पिढीतील नातेवाईकांना कर्करोग झाला असल्याचे दिसून येते. आई-वडिलांकडून मिळालेल्या जनुकांच्या वारशामुळे सिस्टीक फायब्रोसीस, सिकल सेल अॅनिमिया यासारखे रोग होतात. कर्करोग मात्र आनुवंशिक नसून, मुख्यत्वे माणसाच्या जीवनशैलीमुळे होतो, असे दिसून येते. त्यामुळे प्रश्न पडतो, […]