नवीन लेखन...

हलकं फुलकं लेखन. यात विनोद वगैरे सगळं आलं

हा सागरी किनारा….. लाचखाऊ राजकारण्याचे गाणे

हा सागरी किनारा…………………………. हा सागरी किनारा ओला सुगंध वारा…………………………. ओला सुगंध वारा ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा…………….. मिटल्या मुठीत आहे हा रेशमी निवारा हा सागरी किनारा…………………………. हा सागरी किनारा ओला सुगंध वारा………………………….. ओला सुगंध वारा ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा………………. मिटल्या मुठीने येतो अंगावरी शहारा मी कालचीच भोळी…………………………. तू कालचाच भोळा मी आज तीच येडी…………………………. […]

शांत सागरी कशास…. तीन वर्षांनंतर

शांत सागरी कशास उठविलीस वादळे?……….. शांत सागरी कशास उठवतोस वादळे? गायिले तुवा कशास गीत मन्मनातले?…………. भांडुन भांड्यावर भांडे कशास आदळे? काय हे तुझ्यामुळे……………………… पहा किती तुझ्यामुळे देहभान हरपले………………………… गृहशांतता हरपते युगसमान भासतात आज नाचरी पळे………….. युगसमान भासतात क्षण एकैक त्यामुळे अमृतमधुर बोल एक…………………….. खडाजंगी बोल तव श्रवणि जो न पाडिलास…………………… श्रवणि माझ्या पाडतोस अधिरता भरे जिवात […]

कुकर…

आज सकाळी चहा घेत बसले होते.. गॅस वर कुकर लावला होता.. या कुकर चं काय एवढं असं विचाराल.. तर हा कुकर माझ्या सासुबाईंचा अत्यंत लाडका बरं का.. 20 एक वर्ष तर नक्कीच झाली असतील त्याला..अहो बरोबरच आहे !.. आपण आपल्या कष्टाने घेतलेल्या वस्तू किंवा भेट म्हणून मिळालेली वस्तू जपून वापरतोच.. वय झाल्यावर जसे म्हाता-या माणसांचे दात त्यांना अच्छा करतात तसंच या कुकर चे स्क्रु एक एक करून याला टाटा करत करत साश्रू नयनांनी निरोपही देतात. […]

लोक…

हवे तेच बोलता मी जमाया लागले लोक सत्य सांगू लागताचि उठू लागे एक एक। …मी मानसी

पण होतं तेच जे बायकोच्या मर्जीचं असेल

समाज कितीही समाज पुरुष प्रधान असेल पण होतं तेच जे बायकोच्या मर्जीचं असेल. संसार स्त्री प्रधान आहे, पुरुष प्रधान वगैरे अफवा आणि अंधविश्वास आहे. या अशा अफवांवर विश्वास ठेवू नका..!! […]

देवा…..

एक भक्त देवाला सारखा तक्रार करायचा, “देवा,या वर्षी फारच थंडी आहे ” “देवा,भयानक उन्हाळा आहे “देवा,भयंकर पाऊस पडतोय,पूर आला “अरे काय महागाई वाढली देवा ” “देवा,धंदा पण मंदावला,गिऱ्हाईकच नाही ” देव पण ऐकुन ऐकुन वैतागला आणि म्हणाला, “तुला खाली येवढा त्रास होत असेल तर वर येतोस का ???? तेव्हापासून भक्त गुपचुप दर्शन घेवुन जायला लागला !

मराठी भाषेची मज्जा !!!

आज मराठी राजभाषा दिन………… मी आज शपथ घेतली; दिवसभर फक्त आणि फक्त मराठीतच बोलेन… शपथ घेतो तोच बायकोनं आज्ञा केली.”अहो! कॉर्नर च्या मेडीकल शॉप मधून बाळाला डायपर आणून द्या. मी औषधालयात गेलो अन सांगितले:- शिशू शीसू सुलभ शोषक कटी शुभ्र लंगोट द्या…….. ते म्हणले: पतंजलीत तपास करा.

अनुप्रास अलंकार चारोळी

अनुप्रास अलंकार चारोळी (१) गाता गीत गाऊनी गायकाघरी गायकी गाजती गीतमैफीली गान कोकीळ गात की (२) चमच्याने चिवडा चाखा चाखतांना चापून चारा चिवड्यातल्या चारदाण्यासह चावून चावाच चुपचाप सारा (३) गंध गुलमोहराचा गंधाळला गारवारा गोकर्ण गेला गगनासी गुरवाघरी गेला गावसारा (४) हलवाई हलवती हलवा हल्दीरामचीच हवा हिरवीबर्फी हिरवापिस्ता हिरव्यातील हिरवा (५) नव्याची नवलाई नवरीच्या नथनीची नाकात नसतांना […]

गारवा थंडीचा

सकाळी गारवा थंडीचा किलबिलाट घुमतो पक्षांचा सखी गुथलेली कामात रुणुझुणुतो ताल पावलांचा @ शरद शहारे वेलतूर

लेखणीवरील तीन चारोळ्या

*चारोळी क्रमांक १* लेखणीतील शाई कागद करी काळा अर्थप्रवाही वाक्य वाच सगळी बाळा *चारोळी क्रमांक २* लेखणीतून झरे कागदावरी ज्ञान तिथे अज्ञान सरे लोका करी सज्ञान *चारोळी क्रमांक ३* ज्ञानगंगा वाहते ही स्त्रवता लेखणी सरस्वती रमते साहित्यात देखणी सौ.माणिक शुरजोशी

1 2 3 40
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..