लोक
बोललो जेव्हा मनीचे ते न त्यांनी ऐकले । आज म्हणती बोल काही मौन जेव्हा घेतले ।। …मी मानसी
बोललो जेव्हा मनीचे ते न त्यांनी ऐकले । आज म्हणती बोल काही मौन जेव्हा घेतले ।। …मी मानसी
तुला मी मला तू किती जपलं आजवर मनात तेच रुजलंय खूप खूप खोलवर ! त्याचा बहर मनांत खुलतो तुला नि मला दोघांनाच कळतो ! — ….. मी मानसी
आवाज माझ्या कवितेचा माझ्यापेक्षा मोठा आहे माझा फक्त कानापर्यंत त्याची झेप थेट हृदयात आहे
मोहोळ आठवणींचे मोहोळ तरंग होऊन विरतात ! त्यातच तुझे असणे क्षण सुखाऊन जातात !! चेहरा जगताना उघडे व्रण मरणांनंतर उघडेपण ! संकृतीच्या मुखवट्यात चेहरा जगतो क्षण !! कवडसा सूर मारल्यानंतर डोहाचा तळ कळू लागतो काळाची पाने झडल्यानंतर अर्थ कळू लागतो !! नवग्रहांच्या छायेतील “स्व” एक कवडसा कळता कळता प्रवास हळूच संपून जातो !! ब्रम्हांडाच्या […]
साहित्याचा चोर मी पण साहित्यिक थोर मी वाङ्मयचौर्याविरुद्ध नेहमी लढतो की घनघोर मी ! – – सुभाष स. नाईक (९८६९००२१२६)
एक होती टोरली, होती भली-थोरली ती होती सगळ्यांच्या कायम नजरेम्होरली रात्री होती जागेवर, नव्हती तिथें सकाळीं झाली पळापळी, अन् एक प्रश्न सर्वां छळी – ‘येवढी थोरली टोरली, कशी असेल चोरली’ ? – – – टोरली : Trolley – सुभाष स. नाईक (९८६९००२१२६)
प्रचारामधें खुशाल भांडा नंतर आकडे मांडा सत्तेसाठी कशास थांबा ? कुणांसही द्या पाठिंबा .
५0 लाख वाहने दिल्लीत रोज हवेत विष ओकतात. जीवाणू नाशक आणि विषाणू नाशक विष पाण्यात / थंड पेयांत टाकले जाते, जेणे करून ते कधी खराब होऊ नये. जेवणात हि आपण अन्नाच्या माध्यमातून किटनाशक, जीवाणू नाशक आणि विषाणू नाशक रसायने घेतोच. रोज रोज विष पिण्याचा परिणाम भोगावाच लागेल, त्यातून कुणाचीही सुटका नाही. […]
एक अल्हड भोळी नदी भटकून शहरात आली मिळाली तिला ओळख नवी गंदा नाला नंबर अकरा टीप: अंबाझरी तलावातून निघणारी नाग नदी आता नाग नाला म्हणून ओळखली जाते. असी नदी असी नाला इत्यादी. बहुतेक शहरांच्या जवळून वाहणाऱ्या सर्व नद्यांना नाला म्हणून नवी ओळख मिळालेली आहे.
शेरो शायरी करन माझा पेशा नाही, माझा पेशा दूसराच आहे चुकुन पडलो या प्रेमात आता मी तुमच्या सारखाच आहे लेखकाचे नाव :प्रशांत गांगर्डे लेखकाचा ई-मेल :prashant.gangarde1@gmail.com
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions