व्हॉटसअॅप हे आता जलद संवादाचं एक माध्यम झालेलं आहे. इंटरनेटपेक्षाही व्हॉटसअॅपवरुन जास्त प्रमाणात माहितीची देवाणघेवाण होत असते. याच व्हॉटसअॅपवरुन फॉरवर्ड होउन येणारे वेगवेगळे संदेश या विभागात प्रकाशित होतात. या संदेशांचा मूळ स्त्रोत बर्याचदा अज्ञात असतो. जर कोणाला तो माहित असेल तर जरुर कळवावा. योग्य ते क्रेडिट नक्कीच दिले जाईल.
WhatsApp वरुन आलेली कविता आयते शर्ट ते बी ढगळ, चड्डीला आमच्या मागून ठिगळ!! त्यावर करतो तांब्यानी प्रेस, तयार आमचा शाळेचा ड्रेस!! खताची पिशवी स्कूल बॅग, ओढ्याचं पाणी वाॅटर बॅग!! धोतराचं फडकं आमचं टिफीन, खिशात ठेवुन करतो इन!! करदोडा आमचा असे बेल्ट, लाकडाची चावी होईल का फेल ? मिरचीचा ठेचा लोणच्याचा खार, हाच आमचा पोषण आहार!! रानातला रानमेवा भारी मौज, […]
WhatsApp वरुन आलेली कविता महिनेमागून महिने, शेवटी वर्ष सरुन जाते वृध्दाश्रमाच्या पायरीवर , वाट तुझी पाहाते भिजून जातो पदर , अन मन रिते राहाते कधी मधी मात्र , तुझी मनीऑर्डर येते पैसे नकोत यावेळी , तूच येऊन जा बाळा मला तुझ्या , घरी घेऊन जा तुझा बा होता तोवर , काळ बरा गेला तुझी आठवण काढत , उघड्या डोळ्यांनी […]
1. रविवारची गाफील सकाळ:- ते सगळं अशाच एका आळसटलेल्या रविवारी सूरू झालं… सोनाली स्वयंपाकाच्या तयारीत, संगणकावर ह्रूदयनाथ मंगेशकरांची गाणी आणि मी मस्त चहा पीत, पेपर वाचत बसलो होतो. चिन्मयी आली आणि म्हणाली ” बाबा school मध्ये Elocution Competition अाहे, मराठा history च्या topic वर speach तयार करायचीय. मला help कर ना” मी ” हूं…help? आईला विचार.. […]
नर्मदा परिक्रमा ही एकच अशी यात्रा आहे जिथे तुमच्या सगळ्या खर्चाची तरतूद सेवा मार्गातील ग्रामस्थांकडून केली जाते, असं मानलं जातं. प्रतिभा आणि सुधीर चितळे हे गेल्या चार वर्षांपासून ही सेवा देत आहेत. पुण्याहून यात्रेला निघताना चितळे दाम्पत्य आपल्या मारुती व्हॅनमध्ये स्वत:चे कपडे व ५०-६० ब्लँकेटस्, २५-३० स्वेटर्स, शंभरेक कानटोप्या, वेगवेगळ्या मापाचे चप्पल- बूट इत्यादी घेऊन निघतात. […]
दमलेल्या जीवाला आपल्याच माणसांचे स्पर्श , जवळच्या व्यक्तीशी बोललेले प्रेमाचे दोन शब्द जेव्हा अधिक महत्वाचे वाटतील तेव्हाच हा बदल शक्य होईल अन्यथा हे मृगजळ आपल्याला नेहमीच भुलवत राहील ह्यात शंका नाही….. […]
सायली राजाध्यक्ष यांचा WhatsApp वरुन आलेला हा लेख शेअर करत आहे… कितीही वय वाढलं तरी आई आणि मुलगी हे नातं काही फारसं बदलत नाही. म्हणजे वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यात वयानुसार बदल होत जातात पण नात्याचा मूळ गाभा तोच राहातो. लहान असताना आई म्हणजे मुलीचं सर्वस्व असते. ती तिच्यासाठी जगातली सगळ्यात देखणी बाई असते. तिच्यासारखं दिसावं, तिच्यासारखे […]
स्त्री यंत्र नाही हो , ती ही माणुस आहे . तीला ही मन आहे ,ह्रदय आहे. तीला ही भावना आहेत . ती ला ही हसावेसे वाटते . चारचौघांमध्ये मिसळावेसे वाटते . आपल्या विचारांना प्रकट करावेसे वाटते . काम करून ती ही थकते . ती ला ही आरामाची गरज असते . असे म्हणतात की या जगात कोणीही […]
कागदावर जुळलेली पत्रिका आणि काळजावर जुळलेली पत्रिका यात अंतर राहतं. लाखो मनांच्या समुद्रातून योगायोगाने २ मनं अगदी एकमेकांसारखी समोर ठाकणं जवळ-जवळ अशक्य आहे, हे मानूनच हा डाव मांडायचा असतो. वेगळ्या वातावरणात, संपूर्ण निराळे संस्कार लाभलेले २ जीव, एकमेकांसारखे असतीलच कसे? सुख-दुःख, प्रेम, भांडणाचे काळे पांढरे चौकोन ओलांडण्याचा खेळ खेळवणं हीच तर नियतीची जुनी हौस आहे. सरळ […]
आज आईचा रागरंग जरा वेगळाच भासला, तिने बाळाला जवळ बोलावले व गप्पा मारता मारता सहज प्रश्न विचारला, “बेटा मला सांग, कसे रे फेडशील पांग या माउलीच्या कष्टाचे? तुला जन्म देताना मरण यातना भोगल्या, तुला वाढविताना रात्रींचा सुध्दा दिवस केला. तुझ आजारपण, पडण, रडण, दुखण, भरवणं, शिकवण काय काय नाही केल. स्वत:च जगणंच विसरले मी.” मुलगा म्हणाला, […]