विविध ठिकाणांहून येणार्या फॉरवर्डेड मेल्समधून इंटरनेटवर फिरत असलेला हा मजकूर आमच्या वाचकांनी येथे फक्त शेअर केला आहे. स्वामित्त्वहक्क ज्याचे-त्याचे अबाधित आहेत.
…. यमूनेशी कलून बसलेल्या यशोदेची अस्वस्थता काठाच्या पाण्याबरोबर लपलप करत होती. तिचं पाण्यातलं प्रतिबिंब विरळ होत चाललं… यमूना सावळी दिसू लागली, तशी आपल्या मागे चोरपावलांनी खट्याळ कान्हाच येऊन उभा की काय वाटून गर्रकन फिरून यशोमती उभी झाली. पण तिची काजळभरली नजर लांब जाऊन रिकामीच परत आली.. दूरपर्यंत फक्त हळूवार पावलांनी उतरत जाणारी सांज तेव्हढी दिसली. क्षितीजावर […]
तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ? एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ? अजुनही विझल्या न गगनी , तारकांच्या दीपमाला अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ? सांग, ह्या कोजागरीच्या , चांदण्याला काय सांगू ? उमलते अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे ? बघ […]
“मी कुणाला कळलो नाही” मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही.. नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही… सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही.. ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही.. केला सामना वादळाशी त्याच्या पासून पळालो नाही.. सामोरा गेलो संकटाना त्यांना पाहून वळलो नाही.. पचऊन टाकले दु:ख सारे कधीच […]
आई म्हणायची ‘श्री’ लिहावे नव्या पानावरती, वापरावी नवी वस्तू, कुंकू लावल्या वरती. आई म्हणायची संध्याकाळची, झोपी जातात झाडे, अजून फुलं तोडायला हात होत नाहीत पुढे. आई म्हणायची मिळतेच यश, तुम्ही करत रहा काम, भीती वाटली कि फक्त म्हणावे, राम,राम,राम. आई म्हणायची काहीही असो, होतो सत्याचाच जय, अजूनही खरं बोलायला वाटत नाही भय. आई म्हणायची ठेवा श्रद्धा […]
अभिनेता दिलीप कुमार म्हणतात “जेव्हा माझं करिअर उंची वर होत… प्रसिध्दी पदरी होती माझ्या… सगळीकडे मान, सन्मान मिळायचा.. त्या वेळचा हा जीवनप्रसंग….. एकदा मी विमानाने प्रवास करत होतो… माझ्या बाजुला एक साधा, वयाने माझ्यापेक्षा मोठा असलेला प्रवासी बसलेला होता… माणूस खुपच Simple…कपडे त्यांनी साधे च लावलेले… Middle class वाटत होता… पण तो प्रवासी सुशिक्षित वाटत होता.. […]
तू गुंतला असा की जगण्यास वेळ नाही अन् सांगतो जगाला मरण्यास वेळ नाही गाणार गीत केव्हा तू सांग जीवनाचे जेव्हा तुलाच वेडया हसण्यास वेळ नाही आयुष्य तू तुझे तर जगतो खुशाल आहे आता जगाकडे ही बघण्यास वेळ नाही मिटणार ना कधी जे ते नाव दे यशाला म्हण एकदा तरी की हरण्यास वेळ नाही आयुष्य युद्ध आहे […]
प्रा. विजय पोहनेरकर यांची एक लाईटमुडची खुसखुशीत कविता …… ” डोक्याला ताण करून घ्यायचा नाही ” उगीच गळा काढून बोन्बलायचं नाही अन डोक्याला ताण करून घ्यायचा नाही कामाच्या वेळेस खूप काम करायचं कष्ट करतांना झोकून द्यायचं पण Life कसं मजेत जगायचं ……. फिरा वाटलं फिरायचं लोळा वाटलं लोळायचं सुनंला काय वाटल ? पोट्टे काय म्हणतेल ? […]