नवीन लेखन...

हलकं फुलकं लेखन. यात विनोद वगैरे सगळं आलं

नवीन वर्षाचा संकल्प

नविन वर्षाच्या Startup ला करूया एक Resolution Mute झालेल्या संवादांचं पुन्हा जोडूया Connection आयुष्याच्या Wall वरचं हेच खरं Relation —  सौ.अलका वढावकर

तरीही माझं जीवन सुखाच होतं

व्हॉटसअॅप हे आता जलद संवादाचं एक माध्यम झालेलं आहे. इंटरनेटपेक्षाही व्हॉटसअॅपवरुन जास्त प्रमाणात माहितीची देवाणघेवाण होत असते. याच व्हॉटसअॅपवरुन फॉरवर्ड होउन येणारे वेगवेगळे संदेश या विभागात प्रकाशित होतात. या संदेशांचा मूळ स्त्रोत बर्‍याचदा अज्ञात असतो. जर कोणाला तो माहित असेल तर जरुर कळवावा. योग्य ते क्रेडिट नक्कीच दिले जाईल. माझं घर तसं तीन खोल्यांचेच होतं- आजोबांपासून […]

त्यांच्या प्रतिभेला सलाम !!

१९७६ साली कराडला साहित्य संमेलन झाले त्याचे मावळते अध्यक्ष होते पु. ल. देशपांडे आणि उगवत्या अध्यक्षा होत्या दुर्गा भागवत. संध्याकाळी एक कवी संमेलन होतं आणि सूत्रसंचालक होते पु.ल. आणि त्यामुळेच, त्या कवी संमेलनात एक खेळीमेळीचं वातावरण होतं. त्यावेळी हिंदी चित्रपट सृष्टीतले एक मोठे कवी साहीर लुधियानवी मंचावर आले. ते म्हणाले- “अभी मैं जो हिंदी कविता सुनाने […]

हृदयात वार करुन जाणारा त्रास

एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून […]

रस्त्यावरचा गोंधळ

भारतातील कुठल्याही शहरातील कुठल्याही ट्राफिक सिग्नल जवळ दिसणारे चित्र हा देश किती मागासलेला आहे याचे एक उदाहरण आहे. दोन लेनचा रस्ता असो वा तीन लेनचा, सिग्नल जवळ त्याच्या सहा-सहा लेन कशा होतात. अत्यंत सुशिक्षित वाटणारे लोक जेव्हा आपल्या गाड्या लेनची शिस्त मोडून पुढे घुसवण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी डोक्याला हात लावावासा वाटतो. न्यूयॉर्क सारख्या शहरात ४ जुलैला […]

आडनावांच्या नवलकथा – माअी

काही मराठी आडनावं अशी आहेत की ती आडनावं आहेत यावर विश्वासच बसत नाही. काही व्यक्तीनावंही आडनावं असतात. वसंत, दशरथ, मनोहर वगैरे. माअी हे आदरयुक्त स्त्रीलिंगी टोपण नाव आहे. या नावाचीच ही नवलकथा ….. माझे काका 90 वर्षांचे आहेत. (1976 साल). सलूनमध्ये जाअून केस कापून घेणं ही अलीकडची पध्दत. पूर्वी न्हावी घरी यायचा आणि ज्यांचे केस वाढले […]

“मरावे परी कीर्तिरूपे उरावे” – मी जालावर लेखकू का झालो

दोन-तीन दिवस अगोदर मला माझ्या एका मित्राने प्रश्न विचारला. ‘पटाईतजी सच सच बताओ आपने इंटरनेट पर लिखना क्यों शुरू किया’. त्याने विचारलेल्या प्रश्न ऐकून मी विचारात पडलो. मी अंतर्जालावर लिहिणे का सुरु केले? नकळत समर्थांचे वचन आठवले. समर्थ म्हणतात, ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’. प्रत्येक नश्वर जीवाला अमर व्हावेसे वाटते. मृत्यू लोकात शरीराने कुणीच अमर होऊ शकत […]

पैसा

पैसा एकच आहे पण व्यवहारातील त्याची नावे मात्र बदलतात. उदा: १) चर्च मधे दिल्यास त्याला “ऑफरींग” म्हणतात. २) शाळेत दिले तर त्याला “फी” म्हणतात. ३) लग्नात दिले तर त्याला “हूंडा” म्हणतात. ४) घटस्फोटात दिले तर त्याला “पोटगी” म्हणतात. ५) दुसऱ्यास दिले तर त्याला “उसने दिले” म्हणतात. ६) शासनास दिले तर त्याला “कर” म्हणतात. ७) न्यायालयात दिले तर त्याला “दंड” म्हणतात. ८) निवृत्त व्यक्तीस […]

कळावे आणि लोळावे…

पत्र लिहून झाल्यावर आपण खाली लिहितो ‘कळावे’ पण याचा पत्रातील आधीच्या मजकुराशी काही संबंध असतोच असे नाही. खरंतर पत्राचा समारोप मजकुराशी सुसंगत शब्दांनी व्हायला हवा असं माझं म्हणणं. उदा… १) प्रिय, तू ज्या रस्त्याने जात आहेस तो खूप डेंजर आहे. वळावे… २) मित्रा, तुझ्या प्रेयसीचा भाऊ तुला फटकवायला येत आहे. पळावे… ३) प्रिय, तुझ्या आवडीच्या भजीसाठी […]

1 32 33 34 35 36 40
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..