पांडेजी बसले पंगतीला चेलेही होते संगतीला खाउन भरपुर पांडेजींनी ग्लास ग्लास रिचवले पाणी . ‘आता भरपेट जेवणार कसे? ’ एक चेला त्यांना पुसे. ‘पाणी शिंपडल्याने वरती खाली दबली जाते माती. तसेच पाणी पिऊन घडते दबते जेवण, जागा होते. आता पहा रिचवीन भराभर ताटातिल भाताचे डोंगर’. -सुभाष स. नाईक
ग्लास भर whisky थेंबभर पाणी असे ग्लास मी सात-आठ ‘हाणी’ त्यानंतर झाले आजार डॉक्टरने केले बेजार हे खा, ते घ्या, हे नको कंटाळून गेली बायको तरी अजुन मी भरतो पेला ग्लासभर पाणी, थेंबभर हाला . – (हाला – मदिरा ‘हाणणें’ – भरपूर खाणें-पिणें ) सुभाष स. नाईक
एक होती टोरली, होती भली-थोरली ती होती सगळ्यांच्या कायम नजरेम्होरली रात्री होती जागेवर, नव्हती तिथें सकाळीं झाली पळापळी, अन् एक प्रश्न सर्वां छळी – ‘येवढी थोरली टोरली, कशी असेल चोरली’ ? – – – टोरली : Trolley – सुभाष स. नाईक (९८६९००२१२६)
झालो मी अठरा वर्षांचा म्हणुन मिळे अधिकार नामी. मत देण्याचा. या दिवशी मी आहे राजा ताजा ताजा. उलथिन मी नेत्यांची तख्तें बदलिन मी नावांचे तक्ते. – तख़्त – सिहासन — सुभाष स. नाईक