नवीन लेखन...

बाबाची आई

एक होती म्हातारी,  ती  सर्वांना धारेवर धरी उपास तापास नी सोवळ ओवळ त्रस्त केल तीन घर सगळ तिच्यापुढे चालेना कुणाच काही कारण  ती बाबांची होती आई. — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com    

एक सुंदरी

बस मधून चाललो होतो मी,  शेजारी होती जागा रिकामी येवून बसली जवळ एक सुंदर, चंचल तरूण बालीका तिला बघून मनाची खुलली कलीका तरीही मी एका क्षणांत माझी जागा बदलली बरका कारण ती हासत मुरकत म्हणाली “  थोडसं, सरकता का तिकडे काका ? ” — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

मॉर्डन तरूण

अगदी मॉर्डन कॉलेज कुमारांचे बसले एक टोळके गाडीत समोर हासत होते, खिदळत होते,  गप्पा मारीत होते, ऐकण्यासारखे होते परंतु सांगण्यासारखे नव्हते. स्टेशन येताच सारे उतरले तेव्हा मी एकास विचारले “आपल नाव सांगता ?” उतरता उतरता ऐकू आले “ मी आहे मिस निता ” — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

चिठ्ठीवरला मजकूर

टेबलावर ठेवले होते बॉसने काहीतरी लिहून हाताखालच्या लोकांनी निरनिराळे अर्थ काढले त्यातून कुणास काहीच समजेना, म्हणून असिस्टटने केली विचारणा चिठ्ठी वाचून बॉस म्हणाले मला काय म्हणावयाच होत तेव्हा, समजत नाही आता, ती आहे एक नवकविता — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

असंबधता

त्याला तपासण्यासाठी,  नेले मेंटल हॉस्पीटलला की तो आजकाल असंबद्ध बोलू लागला पण डॉक्टर संतापून म्हणाले तुम्हाला त्याची समज असावी, की तो आहे एक ‘नवकवी’ — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

सिनेमाला चला

नको जाणे सिनेमाला, गर्दीचा आहे पहिलाच दिवस याच विचाराने थिएटर पडले ओस चला जावू सिनेमाला, आजच्या दिवशी शेवटी. निराशली मंडळी,  बघूनी हाऊस फूल पाटी — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

गर्दी पांगविण्याची कला

गर्दी गर्दी गर्दी, सर्वत्र त्रस्त करून टाकणारी गर्दी. गर्दीला पांगविण्याची, कला मला सापडली वही घेवून संग्रहातील कविता मी वाचली — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

माझी नोकरी

नकार देत होती माझ्या प्रेमाला, बघून,  मी आहे एक बेकार जळत होते, जळत होते तिच्या विणा माझे शरिर सर्व शांत झाले आता, फायर ब्रिगेड नोकरी मिळता — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

सारेच चोर

हासतात तुला वेड्या ते, पकडला गेलास समजून परि सहानूभूती आहे त्यांच्यात, चोर आहेस म्हणून — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

काळी बायको

काळी तिरळी बायको लाभून, मिळाले खूप समाधान. कसे काय बुआ  ?   असे विचाराल तर तिच्याकडे कुणी बघत नाही म्हणून — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..