नवीन लेखन...

फवारे हास्याचे – (4)

साहित्याचा चोर मी तरि साहित्यिक थोर मी थोर वाङ्मयचौर्याविरुद्ध नेहमी पण लढतो  घनघोर मी  ।। -सुभाष स.नाईक

फवारे हास्याचे – (3)

पांडेजी बसले पंगतीला चेलेही होते संगतीला खाउन भरपुर पांडेजींनी ग्लास ग्लास रिचवले पाणी . ‘आता भरपेट जेवणार कसे? ’ एक चेला त्यांना पुसे. ‘पाणी शिंपडल्याने वरती खाली दबली जाते माती. तसेच पाणी पिऊन घडते दबते जेवण, जागा होते. आता पहा रिचवीन भराभर ताटातिल भाताचे डोंगर’. -सुभाष स. नाईक

फवारे हास्याचे – (२)

ग्लास भर whisky थेंबभर पाणी असे ग्लास मी सात-आठ  ‘हाणी’ त्यानंतर झाले आजार डॉक्टरने केले बेजार हे खा, ते घ्या,  हे नको कंटाळून गेली बायको तरी अजुन मी भरतो पेला ग्लासभर पाणी, थेंबभर हाला . – (हाला – मदिरा ‘हाणणें’ – भरपूर खाणें-पिणें  ) सुभाष स. नाईक

फवारे हास्याचे (१)

पाहत असतां सिनेमा ‘सिंघम’ अविरत चघळत होतो चिंगम हाणामारी दावी पडदा जोराने मी करी ओरडा गिळलें चिंगम, चिकटे गळ्यात धावत गेलो इस्पितळात . – (चिंगम – च्युइंग गम् ) सुभाष स. नाईक  

काटा रुते कुणा कुणाला ….

मोदी: काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी उद्धव: मज फूलही(कमळ) रुतावे हा दैवयोग आहे ! केजरीवाल: सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची ? राहुल गांधी: चिरदाह वेदनेचा मज श्राप हाच आहे ! अजित: काही करु पहातो रुजतो अनर्थ तेथे मनमोहन: माझे अबोलणेही विपरीत होत आहे ! भुजबळ: हा स्‍नेह, वंचना की, काहीच आकळेना बारामती: आयुष्य ओघळोनी मी […]

स्वच्छता मोहीम……..

मिडिया आली, प्रेस आली,

खटाखट कॅमेरान्ची बटने दाबली,

चित्रे दिसली गोजिरवाणी,

नाही नां येणार वेळ लाजिरवाणी?
[…]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..