लहान मुलाकडे पाहून आपल्याला प्रेरणाच मिळते म्हणून आपण म्हणतो लहान पण देगा देवा आपल्याला पुन्हा लहान मुलासारखं निरागस व्हावंसं वाटतं. प्रेरणेचे खत मिळाले की व्यक्तिमत्व बहरतंच. माणसे पोकळीत वाढत नाहीत माणसांना सहवास आवश्यक असतो तो हवाहवासा प्रेमाचा असेल तर केवळ आनंददायी नव्हे तर कर्तुत्वाकडे नेणारा तो हवाहवासा प्रवास असतो. […]
फुलांसारखे शब्दही जपून ठेवायला हवेत.वहीत असलेलं फुल वाळलेलं असलं तरी कधीच मरत नाही. ते आठवणीचं मोरपीस प्रमाणे मनाला शहारें आणतं. फुलं आठवणी ताज्या करतात. या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस कां? जळीस्थळी प्रेयसीला शोधण्याचे एक वय असतं. माणसांपेक्षा फुला वर माणसें जास्त विश्वास टाकतात. […]
एकदा एक शिष्य आपल्या गुरुंना म्हणतो की मला असा एक प्रभावी मंत्र द्या ज्याच्यामुळे आत्मशांती लाभेल. गुरु म्हणतात की रोज तुझ्या आराध्य दैवतेचा नामजप कर आणि दुसरे कोणतेही विचार मनात येणार नाहीत याची काळजी घे. विशेषतः लाल माकडाचा विचार तर अजिबातच करू नकोस. […]
हिंसा परमो धर्म: नावाची, डोळ्यात अंजन घालणारी एक सुंदर कथा मुन्शी प्रेमचंद यांनी लिहिली आहे. एका प्रसंगी नीचवृत्ती मौलवीच्या तावडीतून एका हिंदू युवतीला साधाभोळा जामीद वाचवतो व घरी सुखरुप पोहचवतो. या उपकाराची परतफेड कशी करु असे तिचा पती विचारतो. त्यावर जामीद म्हणतो, ” संकटात सापडलेल्या कुणाचीही मदत कर. तीच माझी परतफेड असेल.” या कथेतून माझ्या विचारचक्रास गती मिळाली. […]
मला आश्चर्य वाटायचं. सुखवस्तू आणि झोपडीतली माणसं,माणूस म्हणून सगळे सारखेच. आम्हाला जेवढं मिळतं ते कमीच वाटतं. त्या सुखाचे ही अनंत प्रकार. सगळंच हवं असतं. आणि हा रामकृष्ण, इतके वय झालेला. अजून कष्ट करतो तेही विनातक्रार.आला दिवस कसा जाईल अशा परिस्थितीत हा इतका संतुष्ट कसा? […]
पानामागून पाने गळावीत तसे दिवस गळत जातात. मनात पाय रुतवून ..ओल्या खुणा ठेवून. नवी पालवी फुटते पुन्हा, पुन्हा दिवसही येतच राहतात, तशी माणसेही येतात आणि जातात…तीही एक पानगळअसते. कोणी कोणासाठी थांबायचं? कशाशी एकनिष्ठ राहायचं? झाडांनी गळालेल्या पानांशी की नव्या पालवीने झाडाशी? एका ऋतूत किती बदल होतात! तेव्हा नुकत्याच झालेल्या ओळखी आता दृढावलेल्या, तर तेव्हा दृढ आलेले […]
कारातीर्थ !!! क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांना रत्नागिरीत जिथं स्थानबद्ध करून ठेवलं होतं, तो तुरुंग म्हणजे कारातीर्थ ! तुम्हा आम्हा सर्वांचे एक श्रध्दास्थान ! स्वातंत्र्यदेवतेचा धगधगता मानवी अवतार रत्नागिरीत जेथे राहून गेला , ती जागा म्हणजे, कारातीर्थ ! इंग्रजांना भाजून काढणारे आणि देशभक्तांना प्रेरणा देणारे विचारांचे अग्निलोळ जिथे अधिक प्रखर झाले ती जागा म्हणजे, कारातीर्थ! विधायक समाजसेवेचा […]