एका भटक्याने अनुभवलेला अफगाणिस्तान
गेल्या सहा दशकांत अफगाणिस्तानमध्ये अनेक स्थित्यंतरे झाली. या काळामध्ये ज्या भटक्यांनी अफगाणिस्तानला भेट दिली त्यांनी आपल्याला भावले तसे या देशाबद्दल लिखाण करुन ठेवले आहे. त्यांच्यातलाच एक आहे निक डँझिगर. धाडसी प्रवृतीचा जातिवंत भटक्या पक्षी. १९८२ साली निकला `विन्स्टन चर्चिल फेलोशिप’ मिळाली. या आर्थिक बळावर पुढे निक डँझिगर याने प्राचीन `सिल्क रुट’चा प्रवास करुन त्यातील अनुभवांवर आधारलेले `डँझिगर्स ट्रॅव्हल्स’ हे पुस्तक लिहिले. […]