हिमशिखरांच्या सहवासात – मनोगत
हिमालयाच्या निसर्गाला पावित्र्याची, आध्यात्माची, संस्कृतीची जोड आहे. हिमालयातील पर्वतशिखरे, नद्या, सरोवरे, मंदिरे, निरनिराळी स्थाने यांच्याशी जोडलेल्या कथा, मिथकं ऐकताना मन मंत्रमुग्ध होते. प्रत्येक भागातील चालीरिती, रिवाज, सण, उत्सव, श्रद्धास्थाने, देव-देवतासुद्धा वेगळ्या आणि त्यांना जोडले आहेत पुराणकथांचे, निरनिराळ्या घटनांचे संदर्भ! हे सर्व अनुभवायचे असेल तर अनवट वाटांवर केलेल्या पदभ्रमंतीसारखा दुसरा पर्याय नाही. […]