अनवट पर्यटन – (उगवता छत्तीसगड – १)
मध्य प्रदेश राज्यातील दहा छत्तीसगढी आणि सहा गोंडी भाषिक दक्षिण-पूर्व जिल्ह्यांचे विभाजन करून १ नोव्हेंबर २००० रोजी छत्तीसगड या राज्याची स्थापना झाली. रायपुर हे छत्तीसगड राज्याचे राजधानीचे शहर. छत्तीसकिल्ले असलेले राज्य म्हणून ह्या राज्याला छत्तीसगड असे नांव दिले. ह्या प्रदेशाचा इतिहास रामायण, महाभारत काळापासून होता. वैदिक आणि पौराणिक काळापासून छत्तीसगड अनेक संस्कृतीच्या प्रगती आणि विकासाचे केंद्र होते. येथील पुरातन मंदिरे आणि त्यांचे अवशेष असे दर्शवित आहेत की वैष्णव, शैव, शक, बौद्ध संस्कृतीचा विविध काळात ह्या प्रदेशावर प्रभाव होता. […]