नवीन लेखन...

गिरनार यात्रा (एक नवे सदर)

पूर्ण यात्रेदरम्यान आलेले अनुभव, टाळता येण्यासारख्या चुका, श्रद्धा आणि चिकाटीने बदलेली मानसिकता हे सर्व माझे अनुभव या लेखांदरम्यान प्रामाणिकपणे मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. […]

आफ्रिकेचे बिअर आख्यान

‘केनिया बिअर’चा संस्थापक जॉर्ज हर्स्ट एके दिवशी शिकारीला गेला असतांना त्याला एका हत्तीने ठार मारले. जॉर्जच्या स्मरणार्थ बिअरला ‘टस्कर’ नाव दिले. ही बिअर इतकी लोकप्रिय झाली की इंग्लंडच्या सुपरमार्केटमध्ये ती २००८ सालापासून विक्रीसाठी अवतरली. […]

लवंगांच्या वृक्षांनी डवरलेले झांझीबार

भारतीय, चिनी आणि आता पाश्चिमात्य पारंपारीक आयुर्वेद शास्त्रात लवंगेला मानाचे स्थान लाभले आहे. विशेषतः दंतविज्ञान शास्त्रात दाताच्या दुखण्यावर लवंगेचा वेदनाशामक म्हणून सर्रास उपयोग होतो. त्यामुळे दंतदाह कमी होतो. पचनकारी औषधे-पेयात लवंगेचा उपयोग आलाच. चीन व भारतात मूत्राशयातील अस्वास्थ्य, पोटदुखी, तीव्र खोकला, अतिसार, ओकार्‍यांना प्रतिबंध यासारख्या अठरा दुखण्यांसाठी लवंगेचा वापर होतो. […]

तुमचं आमचं ‘सेम’ असतं !

झांझीबारला जाणार्‍या विमान-प्रवेशाचा पास घेण्यासाठी लागलेल्या रांगेतले सहप्रवासी बघितल्यावर माणिकताईंचे गीत आठवले. ‘सावळाच रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी’. काही तर चक्क कॉफी रंगाचे. म्हटले तर गोरे आणि नाही म्हटले तर सावळे. […]

प्रतिभा – व्हिन्सेंट व्हॅन गॉगची – भाग २

व्हॅन गॉगच्या मृत्यूनंतर चित्रकार म्हणून त्याची कारकीर्द संपुष्टात आली असली तरी जगाला प्रेरणा देणारा भविष्यातील एक महान चित्रकार म्हणून त्यांचा वारसा जपला गेला आहे . त्याची कीर्ती त्याच्या मृत्यूनंतर वाढत गेली. त्याची गणना जगातील महान चित्रकारांमध्ये केली जाते . आधुनिक कलेच्या संस्थापकांपैकी एक असे त्याला मानले जाते. […]

प्रतिभा – व्हिन्सेंट व्हॅन गॉगची – भाग १

ॲम्स्टरडॅममधील जगप्रसिद्ध भव्यदिव्य असे ‘व्हिन्सेंट व्हॅन  गॉग’ म्युझियम हे व्हॅनगॉगच्या चित्रकला प्रदर्शनाचे सर्वात  मोठे म्युझियम होय. या म्युझियम मध्ये 200 पेक्षा अधिक रंगवलेली चित्रे, पेंटिंग्स, पाचशे चित्रे ,चार स्केच बुक्स,  तसेच व्हॅन गॉगच्या अक्षरात लिहिलेली सातशे पत्रे आहेत.  कलाकाराची कला कशी  प्रगल्भ आणि सुंदर होत जाते याचा उत्कृष्ट नमुनाच बघायला मिळतो . […]

झांझीबार डायरी – अवघा रंग एकचि झाला

एकदा का मुलाच्या वडिलांनी, आईने, मोठ्या मुलाने व धाकट्या मुलीने ‘छान आहे’ म्हटले की मुलगी पसंत झाली मानायचे. अगदी तसेच वॉशिंग्टन-दिल्लीच्या विश्वबॅंक कार्यालयाने, दारेसालामच्या आफ्रिकन डेव्हलपमेंट बॅकेने आणि झांझीबारच्या परिवहन मंत्रालयाने माझी चरित्रसूची म्हणजे बायोडेटा ओके केल्याचे म्हणजे ‘मी पसंत पडल्याचे’ संगणक टपाल आले. माझी झांझीबारच्या रस्ते वाहतूक, जलमार्ग व हवाई वाहतूकीची कृतियोजना अहवाल तयार करून […]

झांझीबार डायरी…. एक अप्रतिम पुस्तक… क्रमशः

झांझीबार डायरी हे एक प्रवासवर्णन नाही.  जागतिक बॅंकेच्या कामानिमित्त अरुण मोकाशींनी केलेल्या झांझीबार वारीमध्ये त्यांनी अनुभवलेले झांझीबारमधील जनजीवन, तिथल्या प्रथा-परंपरा, सोहोळे, वन्य-जीवन यासारख्या विषयांवरील अत्यंत सुंदर लेखांचे हे संकलन आहे. मोकाशी यांनी अत्यंत प्रभावी भाषेत, खेळीमेळीच्या शैलीत हे सर्व लेख लिहिलेले आहेत. […]

कथा ‘अ‍ॅन फ्रँक’ची

आम्ही युरोपच्या ‘टूरवर’ असताना, नेदरलँड ला उतरलो. ‘अ‍ॅन फ्रॅंक हाऊस ‘ नावाने जागतिक प्रसिद्धी पावलेल्या आणि ऐतिहासिक म्युझियम ला भेट देण्यास निघालो.   तेंव्हा हा रस्ता जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य  पर्यटकांनी फुलून गेला होता. इमारतीच्या दर्शनी भागाच्या समोर उभे राहून शेकडो पर्यटक ‘म्युझिअमचे ‘  फोटो काढून घेत होते.  आम्ही प्रथम तिकीट काढून रांगेत उभे राहिलो आणि जेंव्हा त्या ‘वास्तूत ‘ मी पहिले पाऊल टाकले तेव्हा माझे अंग थरारले.  विशेष लक्षवेधी बाबी म्हणजे अ‍ॅन फ्रॅंक हिचे ‘बोलके मंतरलेले  डोळे’ असणारे चित्तवेधक चित्र आणि प्रवेशद्वारा समोरचा ‘पुतळा’. […]

डुईसबुर्ग जर्मनी ‘प्राणिसंग्रहालयाचा’ फेरफटका – भाग २

आणखीन एका पक्षाने आमचं लक्ष वेधून घेतले आणि तो म्हणजे फ्लेमिंगो! त्यांचे रंग,  लाल,  गुलाबी आणि अबोली. त्याचा मुलाचा रंग राखाडी असतो. परंतु, (कॅरटोनॉइड) गाजरासारख्या कंदमुळाच्या खाण्यातून त्यांना असे विविध छटांचे रंग प्राप्त होतात. […]

1 12 13 14 15 16 24
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..