फुजिझुका (प्रति-फुजी)
जपानचा पवित्र पर्वत कोणता ? असं विचारलं तर पटकन कोणीही (ह्या देशाबद्दल थोडीफार माहिती असणारे) फारसा विचार न करता अंदाजाने सुद्धा सांगू शकतील माउंट फुजी! गिर्यारोहकांचे, ट्रेकर्सचे जपान मधले एव्हरेस्ट! फुजीसान वरती चढण्याचा आनंद आणि पुण्य प्रत्येकाला लाभावं म्हणून तोक्यो व इतरही काही ठिकाणी फुजिझुका म्हणजे प्रति-फुजीसान बांधलेले आहेत. ह्या फुजिझुका म्हणजे प्रति-फुजी वरती चढणे हे खरोखरच्या फुजी वरती जाऊन आल्याचे पुण्य पदरी घालते असे येथील लोक मानतात. […]