शतकाचा साक्षीदार !
कॅनडात मी जे पाहिलं, अनुभवलं ते कधीच विस्मृतीत जाणारं नव्हतं! मी जेंव्हा एकांतात बसतो तेंव्हा एकएक गोष्ट माझ्या नजरेसमोरून तरळू लागते. माझ्याशी बोलू लागते. तिथल्या निसर्गाची किमया व निसर्गाशी अनुरूप मानवनिर्मित कलाकृती मनाला भुरळ घालतात, एक अनोखा आनंद देऊन जातात. त्यापैकीच एक अविस्मरणीय पर्यटन क्षेत्र म्हणजे अटलांटीक महासगराच्या किनारपट्टीवरील पेगीची खाडी (पेगीज कोव्ह) व शतकाचा शाक्षिदार ठरलेले तिथले लाईट हाऊस! […]