नवीन लेखन...

हानाबी (जपान वारी)

हानाबी म्हणजे आतिषबाजी (fireworks). फरक एवढाच की आपल्याकडे दिवाळी सारख्या फेस्टिवल साठी आतिषबाजी केली जाते इथे अतिषबाजीसाठी हा फेस्टिवल.फटाके हा शब्द अपुरा वाटावा अशी सुंदर सजावट. अतिशय विलोभनीय दिसणारी आणि आपल्या प्रकाशाने का होईना रात्रीचा अंध:कार नाहीसा होऊ दे अशी प्रार्थना करणारी अशी हानाबी! […]

साकुरामय – जपानची गुलाबी सफर (जपान वारी)

साकुरा हे जपानचे राष्ट्रीय फूल आहे का? असे सहज काही जपानी लोकांना  विचारल्यास त्यातल्या ५०% लोकांकडून पटकन होकार मिळतो असा माझा अनुभव आहे. सर्व वयोगटात लोकप्रिय असणारे हे साकुरा. राष्ट्रीय फूल नाही बरं का! लोकप्रियताच ती केवढी; गल्लत होते अशी मग! साकुरा सिझन मध्ये मनमुराद आदरातिथ्य करवून घेता येते. जपान देशातल्या अगणित प्रेक्षणीय जागांवरती साकुराचा आनंद आपण घेऊ शकतो. हा साकुरामय जपान पाहणे आणि अनुभवणे नक्कीच एक सुंदर आठवण देऊन जाते हे मात्र खरे! […]

मी पाहिलेला होक्काइदो – दाइसेत्सुझान (जपान वारी)

होक्काइदो मधील पर्वतांची दुनिया ! जपानमधील सर्वात मोठे नॅशनल पार्क म्हणून प्रसिद्ध असणारे हे दाइसेत्सुझान. साधारण २ हजार मीटर (६६०० फूट) पेक्षा जास्त उंच भव्य बर्फाच्छादित पर्वत (Great Snowy Mountains) येथे पाहायला मिळतात. […]

मी पाहिलेला होक्काइदो – बीएई (जपान वारी)

“नावात काय आहे?”… असं शेक्सपियरने म्हटले आहे! याचेच जणु उत्तर देऊ पाहणारे डोंगराळ भागातील हे गाव आहे बीएई. बीएई (Biei) नावाची फोड केली तर सौंदर्य+स्पार्कल असा अर्थ होतो. स्पार्कल म्हणजे काय असावं ? तर चकाकी, चमक, तेज, उमेद,  इ.नावातच सौंदर्य असलेले हे बीएई.  […]

मी पाहिलेला होक्काइदो – ओतारू (जपान वारी)

ओतारू हे ऐनू वस्तीचे शहर, “ओतारू” हे नाव सुद्धा मूळचे ऐनू भाषेतुन घेण्यात आले आहे. ऐनु म्हणजे उत्तर जपानमधील एक जमात आहे. ह्या ऐनु जमातीचे लोकं साधारणपणे सध्या फक्त होक्काइदो मध्ये आढळून येतात. सांस्कृतिक पार्श्वभूमी सुद्धा बहुतेक करून उर्वरित जपानमधल्या लोकांपेक्षा वेगळी आहे. भाषा आणि संस्कृती मध्ये वेगळेपण आहे. ऐनु संस्कृती विषयक पुरावे आणि विस्तारित माहिती देणारी अनेक ठिकाणे होक्काइदो मध्ये आहेत. […]

मी पाहिलेला होक्काइदो – साप्पोरो (जपान वारी)

हाकोदाते पाहिल्यानंतर पुढे ओढ लागली ती म्हणजे होक्काइदोची कॅपिटल सिटी पाहण्याची. “साप्पोरो” हे होक्काइदो मधील सर्वात मोठे शहर असुन इकडे येण्याचा सगळ्यात सोयीस्कर मार्ग म्हणालं, तर हवाई मार्ग.साप्पोरो Planned City असल्यामुळे, शहराची रचना पद्धतशीर आहे. […]

जपान देश आणि इथली माणसं ! (जपान वारी)

जपान या देशात 47 prefectures (राज्य म्हणूयात) आहेत. बाकी सविस्तर माहिती Google च्या कृपेने आजकाल एका Click वर उपलब्ध आहे. तर या देशाच्या चार मुख्य भूभागातील एक आहे “होक्काइदो”. “होन्शू” या मुख्य भूभागानंतरचा जपान मधला मोठा भुभाग. जपानच्या नकाशात पाहिलं तर सगळ्यात मोठा प्रदेश दर्शवणारा हा होक्काइदो. ‘जपान मधला स्वर्ग’ म्हटलं तरी अतिशयोक्ती वाटू नये इतका इथला निसर्ग सुखावणारा आहे. होक्काइदो ची राजधानी असलेले शहर म्हणजे “साप्पोरो” त्या बद्दल नंतर सविस्तर पाहुया… […]

जपान वारी – प्रास्ताविक

आजवर कित्ती तरी बाबतीत जपान देशाचं नाव ऐकलंच असेल. जसे औद्योगिक दृष्ट्‍या जगातील अत्यंत पुढारलेल्या देशांपैकी एक असलेला, उगवत्या सूर्याचा देश. त्याबरोबरच जपानने आजवर भोगलेली भयानक संकटे, इथे होणारे भूकंप, त्सुनामी इथपर्यंत सर्वकाही आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेच. हे सारे घेऊन जगणारे हे जपानी आणि  ह्या देशातील काही रंजक अनुभव, मी या जपान विषयीच्या लेखमालेतून लिहिण्याचा प्रयत्न करीन. […]

सिमेंट प्लांटची भ्रमंती

ऑफिसच्या कामामुळे माझे सिमेंट प्लांटमध्ये येणे जाणे असायचे.हे प्लांट शहरापासून बरेच दूर असतात.तेथे काम करताना आलेले अनुभव,तेथेपर्यंत पोचण्याचा प्रवास आणि प्लांट मधील वर्णन आहे या लेखात केले आहे. […]

हंपी : एक आकलन !

फितुरीने घात केला विजयनगर चा , आणि आपल्या संस्कृतीचा सुद्धा ! तो कदाचित सहज म्हणून बोलून गेला असावा , पण भारताची शेकडो वर्षांची दुर्दशा व्यक्त झाली होती. मित्रानो , केव्हा तरी जा हंपी पहायला . पर्यटन म्हणून नव्हे , तर फितुरीचे परिणाम काय होतात ते पहायला जा आणि पुढच्या पिढीला सावध करा . […]

1 18 19 20 21 22 24
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..