नवीन लेखन...

मला भावलेला युरोप – भाग ७

आल्प्स पर्वतांच्या कुशीमध्ये विसावलेला युरोपचा भाग म्हणजे ,जणू काही प्रत्यक्ष स्वर्गच. प्रत्येक ठिकाणचे आपले असे वेगळे वैशिष्ट्य वेगळेच सौंदर्य.निसर्गाचे एक वेगळेच रूप आपल्या मनावर राज्य करते. माउंट टिटलिसच्या सौंदर्य स्थळांवरुन अजून बाहेरही आलो नव्हतो आम्ही, तर दुसऱ्या दिवशीची रम्य सकाळ आम्हाला,झुंग्फ्रौ येथील निसर्गसौंदर्याचा आस्वाद देण्यासाठी आसुसलेली होती. […]

मला भावलेला युरोप – भाग-६

युरोपात फिरण्यासाठी सिझन चांगला म्हणून मे महिन्यात,हा एकच हेतू ठेवून केलेली टूर पण यथावकाश तारखा बघितल्यानंतर आमच्यासाठी ‘सोने पे सुहागा’ अशी ठरली. आत्तापर्यंतच्या आयुष्यात लग्नाच्या वाढदिवसाला कधीच ठरवून असे मुद्दाम कुठेही गेलो नव्हतो आम्ही. पण यावेळी योगायोगाने थेट स्वित्झर्लंड मध्येच.आणि तेही माउंट टिटलिस ला!माझा विश्वासच बसत नव्हता,पण खरे होते हे! […]

एक अविस्मरणीय सागरी सफर

कधी कधी ना, पर्यटनाचे योग अगदी अचानक जुळून येतात. मनात घोळत होती ती अंदमान सफर. ही दिवाळी संपली म्हणजे करावी का ही सफर? हो-नाही करता करता ती सहल बुक करण्याचे रेंगाळतच राहिले आणि ध्यानीमनी नसतानासुद्धा अचानक पणे ही लक्षद्वीप बेट समुहाची सामुहिक सहल ठरली पण आमची ! […]

मला भावलेला युरोप – भाग ५

युरोपातील सर्व शहरात सायकलींचे प्रमाण खूपच आहे यापूर्वी असा उल्लेखही आलाय. नेदरलँडमध्ये मध्ये तर,तीन मजली लांबच लांब सायकल स्टॅंड बघून आश्चर्य वाटले. तेथे सायकलींसाठी, फोर व्हीलर साठी आणि पायी चालण्याऱ्यांसाठी एकाच रस्त्यावर स्वतंत्र समांतर ट्रॅक्स आहेत .रहदारी एवढी शिस्तीची की,कोणीही ट्रॅक सोडून चुकूनही जाणार नाही. सिग्नल तोडणे हा प्रकार औषधाला सुद्धा सापडणार नाही. कोणतेही वाहन नसेल, […]

निसर्गरम्य तळकोकणचा  प्रवास – आरामदायी  तेजस एक्सप्रेसने

कोकणचा निसर्ग रसिक पर्यटकाना सतत बोलावत असतो. त्यातही  ज्याला रेल्वे प्रवास प्रिय त्यांच्यासाठी तर पर्वणीच. विशेषतः खवय्यांना  तर मांडवी एक्सप्रेस चांगले २०-२५ पदार्थ पेश करते. हिरवा गार निसर्ग,लाल मातीचे डोंगर, घाट मार्गात अनेक बोगदे. रत्नागिरी स्टेशन आखीव नीटस मनात भरणारे. स्टेशन बाहेर रेल्वे बांधणीत मृत्यू पावलेल्या कर्मचारी वर्गाच्या स्मृतिस्मारकासमोर आपण नतमस्तक होतो. […]

मला भावलेला युरोप – भाग ४

लंडन आणि पॅरिस ही फार मोठी अशी राजधानीची शहरं. नितांत सुंदर रचना असणारी. कोणीही त्यांच्या प्रेमात पडावं अशीच. तेवढीच व्यापारीकरणाची लागण झालेली. सुंदर रचनेच्या उत्तुंग इमारतींनी सजलेली,आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी झकपक. येथून आम्ही निघालो ते बेल्जियम ची राजधानी ,ब्रुसेल्स च्या दिशेने. तोही आरामदायी बसने.आजूबाजूच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत घेत. युरोपातील देश आकाराने आणि लोक संख्येने […]

मला भावलेला युरोप – भाग ३

फ्रान्समधील पॅरिस आणि इटलीतील रोम ही दोन शहरे अप्रतिम अशी कलेचे माहेरघरं आहेत हे मात्र नाकारता येणार नाहीच.दोन्ही देशांना मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय इतिहासाची पार्श्वभूमी आहे.पॅरिस शहराला म्युझियम्सचे शहर म्हणतात असा मी पूर्वी उल्लेख केलेला आहेच. राजेशाही अस्तित्वात असणाऱ्या फ्रान्समधील, राजे मात्र कलेचे भोक्ते होते. त्यांना कलेची उत्तम जाण होती आणि ते कलेचा सन्मानही करत असत. उत्कृष्ट […]

मला भावलेला युरोप – भाग २

खरं म्हणजे युरोप विषयी लिहितांना युरोपियन लोकांचे शिष्टाचार, शिस्त,स्वच्छता, त्यांची रहदारीची पद्धत, त्यांनी आत्मसात केलेले तंत्रज्ञान वगैरे गोष्टींवर प्रकाश टाकला नाही तर ते अन्यायकारकच ठरेल. […]

मला भावलेला युरोप – भाग १

आपल्या भारतावर दिडशे वर्षे राज्य केलेले, भारतासारख्या दुभत्या गाईच्या दुधाची संपूर्ण मलयी आपल्या देशात घेऊन जाणारे हे इंग्रज. त्यांचा देश आहे तरी कसा? याची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. […]

मसुरे …. पाचूचा सुंदर गाव

मसुरा आहे साधारण मध्यभागी …… म्हणजे कणकवली आणि मालवण पासून साधारण सारख्या अंतरावर …. गाव एकदम हिरवागार ……तेजस्वी पाचूसारखा …. घनदाट अरण्याचं कोंदण असलेला …लालमातीच्या देखण्या टेकड्यांचा …. त्यावरच्या काजूच्या बागांचा … गर्द आमरायांचा …. आणि त्यात वसलेल्या साध्या पण सुंदर घरांचा …. एक एक घर बघत राहावं असं …. सांडलेलं तेल टिपून घ्यावं … असं स्वच्छ अंगण आणि त्यात मनाला प्रसन्न करेल असं तुळशीवृंदावन … […]

1 23 24 25 26
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..