१७ माईल ड्राईव्ह
‘१७ माईल ड्राईव्ह’ हा कॅलिफोर्नियाच्या किनारपट्टीजवळून जाणारा रस्ता आहे. याचे वैशिष्ट्य असे की, तो लांबवर पसरलेला, वळणावळणाने जाणारा असून त्याच्या एका बाजूला फेसाळणारा समुद्र. कधी स्पष्ट, स्वच्छ दिसणारा तर कधी आडव्या, वेड्या वाकड्या, उंच झाडांच्या मागून लपंडाव खेळणारा. समुद्रकिनाऱ्यावर अतिशय शुभ्र वाळू (snow white sand). किनारेदेखील सरळरेषेत नाहीत. कधी ते जमिनीच्या आत घुसलेले. कधी जमिनीचा चिंचोळा भाग समुद्रात घुसलेला. […]