ब्रह्मगिरी फार उंच पर्वत
वर्षातून एकदा डिसेंबर महिन्यामध्ये मी पंधरा दिवस फिरायला जात असतो. 35 वर्ष रेल्वे त नोकरी केली कुठे सुद्धा फिरता आले नाही रेल्वेची ड्युटी बारा तासाची फक्त मला एक फायदा झाला तो म्हणजे वाचन आणि लेखन. ड्युटी बरोबरच वाचन-लेखन असल्यामुळे माझा वेळ कधी जात होता हे मला समज त सुद्धा नव्हते इतका मी वाचनात आणि लेखनात रंगून गेलो होतो. […]