नवीन लेखन...

‘वेलकम टू कोंकण’

निसर्गरम्य, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जो कोकणाला लाभलेला आहे, तो वारसा कायमस्वरूपी जपण्यासाठी स्थानिक लोक, सरकार तसेच पर्यटन व्यावसायिक ह्या सर्वांनी एकत्र येऊन कोकणासाठी पर्यटन टिकविण्याच्या दृष्टिकोनातून काम केले पाहिजे. […]

अमेरिका – एक आंतरराष्ट्रीय बाजारपेठ

आपल्याकडे गावोगावी, शहराशहरात असतात तशी वाण्यांची दुकाने अमेरिकेत दिसत नाहीत. इथे ‘राल्फस्’, ‘वॉलमार्ट’, ‘कोलह’, ‘टारगेट’, ‘मायकल’, ‘स्पेक्ट्रम’.. अशा मोठमोठ्या मॉल्सची साखळी असते. त्यामध्ये जगाच्या भिन्न भिन्न कोपऱ्यात तयार होणाऱ्या असंख्य वस्तू वेळोवेळी येत असतात. […]

थोडे अमेरिकेविषयी

आजकाल आपल्यापैकी अनेकजण अमेरिकेत येत जात असतात. अमेरिकेविषयी त्यांना माहितीही असते. त्या माहितीत मी ही थोडी भर घालीत आहे. मुळात अमेरिका ही अन्य देशांतील लोकांना सर्वस्वी अपरिचित होती.. भारताच्या शोधात कोलंबस निघाला आणि तो अमेरिकेच्या किनाऱ्याला लागला. […]

सिंहगड ते रायगड – ट्रेक – भाग ३

मोहरीच्या  पठारावर एका झाडाच्या सावलीत मग आम्ही पैक लंच उघडले आणि जेवणाचा आस्वाद घेतला. मोहरीच्या त्या पठारावर उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत होता. एखाद दुसरे झाड वगळता संपूर्ण  पठारावर रखरखाट होता त्यामुळे टेंट मधली जमीन तापली होती. टेंट मधे भट्टी सारखे तापले होते. तरी पण तशा  वातावरणात पण काही मंडळीनी झोप काढल्या. मी मात्र टेंट मधे न जाता बाहेरच गप्पा मारीत बसणे पसंत केले. […]

सिंहगड ते रायगड – ट्रेक – भाग २

मला ही वाट उतरताना तोल जाऊन पडू अशी मनात थोडी भीती वाटत होती, पण प्रत्यक्ष वाट उतरताना फार त्रास झाला नाही. सर्वजण सुरक्षित पणे वाट उतरले. ती वाट उतरताच आम्ही आता गडा पासुन दूर सपाट जागी आलो.मागे वळून पाहिले तर  राजगड मोठ्या  दिमाखात चमकत होता.त्याच्या कडे पाहताना मन भरून येत होते. […]

सिंहगड ते रायगड – ट्रेक – भाग १

काही वर्षांपूर्वी युथ होस्टेल पुणे शाखा सिंहगड ते रायगड अशी शिवदुर्ग दर्शन साहस सहल आयोजित करीत असे. पुण्यातून रोज ३० जणांची तुकडी निघायची ती सर्व भ्रमण पूर्ण करून दहा दिवसांनी परत येत असे. युथ होस्टेल आयोजित हा टेक त्या काळात खूप प्रसिद्ध होता. दहा दिवसाच्या या ट्रेकचे वर्णन तीन भागात देत आहे. […]

जिम कॉर्बेट – भाग ४

युद्धाच्या काळात जिम बराच काळ बाहेर होता. त्याची बहीण मॅगी कालाढूंगीला एकटीच रहात होती. तेव्हा दळणवळणाची साधने पण नव्हती. जवळचे मोठे शहरसुद्धा २० किलोमीटर दूर! पण मॅगीच्या सुरक्षिततेची चिंता जिमला क्षणभरसुद्धा वाटली नाही. कारण ती त्याच्या मित्रांच्या सहवासात पूर्ण सुरक्षित आहे याची त्याला खात्री होती आणि हे मित्र म्हणजे भारतीय लोकच होते. त्यांच्यावर त्याचा पूर्ण विश्वास […]

जिम कॉर्बेट – भाग ३

जिम कॉर्बेटचे भारतावर व भारतीय लोकांवर अतिशय प्रेम होते. तो म्हणतो, ‘माझ्या भारतातील बहुसंख्य लोक नि:संशय भुकेकंगाल आहेत, धनहीन आहेत. पण ते अतिशय साधे, भोळे, प्रामाणिक, निष्ठावान व कष्टाळू आहेत. माझे त्यांच्याशी प्रेमाचे नाते जडलेले आहे.’ जिम बऱ्याच वेळा परदेशी गेला होता पण तो कुठेच रमू शकला नाही कारण त्याचे भारताविषयीचे प्रेम व ओढ! भारत हा […]

जिम कॉर्बेट – भाग २

नरभक्षकांची शिकार साधताना त्याला विलक्षण खडतर तपश्चर्या करावी लागली. हिमालयाच्या थंडीवाऱ्यात, पावसात, उघड्यावर रात्रंदिवस जागत, निश्चित अन्नपाण्याशिवाय दिवसामागून दिवस काढणे ही सोपी गोष्ट नाही. एका वेळी तर गळू झाल्याने त्याचा डावा डोळा पूर्ण बंद झाला होता. कानाच्या पडद्याला भोक पडल्याने ऐकू येत नव्हते. अशा अवस्थेत काहीवेळा दिवसरात्र झोपेशिवाय केवळ चहा बिस्किटांवर राहून काढल्यावरच त्याची नरभक्षकाशी गाठ […]

जिम कॉर्बेट – भाग १

मनसि वचसि काये पुण्यपीयूषपूर्णा: । त्रिभुवनमुपकार श्रेणिभिः प्रीणयन्तः ।। परगुणपरमाणून्पर्वती कृत्य नित्यम । निज हृदि विकसन्तः सन्ति सन्तः कियन्तः ॥ -भर्तृहरि ज्याचे मन, वचन व शरीर पुण्याच्या अमृताने परिपूर्ण आहे, आपल्या परोपकारी वृत्तीने जे सर्वांना आनंदित करतात, दुसऱ्याच्या गुणांचे आचरण करतात, रंजल्या गांजल्या लोकांना आसरा देतात, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात, निरपेक्ष वृत्तीने राहतात अशी सज्जन माणसे […]

1 4 5 6 7 8 26
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..