देवभूमीतील पंचबद्री – योगबद्री
हेलंगपासून १४ कि.मी. अंतरावर ‘जोशीमठ’ हे प्रसिद्ध स्थळ आहे. ह्या स्थानाचे मूळ नाव ‘ज्योर्तिमठ’! जोशीमठ हा अपभ्रंश आहे. जोशीमठ ते बद्रीनाथ हा रस्ता अरुंद व अवघड आहे. या रस्त्यावर जोशीमठापासून २४ कि.मी. अंतरावर पांडुकेश्वर हे गाव आहे. पांडू राजाने आपला अखेरचा काळ या ठिकाणी व्यतीत केला होता. पांडवांची ही जन्मभूमी समजली जाते. असेही सांगतात की स्वर्गारोहणासाठी […]