नवीन लेखन...

डोके ज्याचे त्याचे

झिरो कट ! आता पुन्हा या फॅशनची चालती आहे ! कानाच्या वर चार बोटाच्या पट्ट्यातले केस या कानापासून व्हाया मानगूट ते त्या कानापर्यंत झिरो मशीनने काढून टाकतात. ट्रॅकटरने शेत नागरल्यासारखं दिसत ! त्यात एक ठळक पाय वाट पण बरेचदा केली जाते ! टाळू वर केसांचं ‘ओयासिस’ तसेच ! या ‘ओयासिसचे पुन्हा व्हेरिएशन्स आहेतच, मागे, पुढे नायतर उभे शिंगा सारखे ! […]

‘रोगा’यण !!

खूप दिवसा पासून ,म्हणजे फेसबुक वर ती पोस्ट वाचल्या पासून ,या क्षणाची मी वाट पहात होतो . तो क्षण माझ्या आयुष्यात आलाच ! तसा तो बरेचदा आला आहे .पण आता मला ‘त्या ‘पोस्ट ‘ मुळे नेमकं काय करायचं ते कळलंय ,आणि मी ते करण्याचा निश्चय केला आहे ! […]

बायको आणि मैत्रीण

दोन घट्ट वेण्या घालून सोबत शाळेत येणारी शेजारची ‘निमी ‘ , अचानक एके दिवशी सुंदर पौनी टेल करून येते . ‘ये तुम्ही पोर पोर तिकडं पलीकडं खेळा ‘ म्हणणारी ,हल्ली स्वतःच दूर जाऊन खेळते . फडतूस विनोदाला घोड्या सारखं खिंकाळून हसणारी ,मंद गालातल्या गालात हसते . काल पर्यंत ‘ये मला सायकल शिकव ना ‘ म्हणणारी ‘चल […]

मंचकमहात्म्य – बारक्या

सकाळच्या रामप्रहरी अंड्याच्या दोन पोळ्या , दोन शिळ्या भाकरी ,बचकभर जवसाची चटणी, त्यावर कच्चं तेल आणि चार पातीचे कांदे, असा ‘अल्प ‘ नाश्त्याचा मुडदा पाडून ,मंचकराव पोकळ मुठीने आपल्या भरघोस मिश्या गोंजारत चौपस बंगईवर मंद झोके घेत बसले होते . अंगणात कोवळ्या उन्हाचे कवडसे बिचकत बिचकत डोकावत होते . मधेच पायाचा हलक्यासा रेटा देऊन मंचकराव झोपाळ्याची गती कायम ठेवीत . अश्या रम्य वातावरणात आणि भरल्या पोटी डोळे जडावणे साहजिकच होते. […]

रविवार माझ्या आवडीचा

तुमचा आवडता वार कोणता? असा प्रश्न जर मला कोणी विचारला तर डोळे झाकून कोणताही विचार न करता मी रविवार असेेेच उत्तर देईन. मला सहसा कोणी प्रश्न विचारण्याच्यानगडीत पडत नाही. मी देखील विचार करून नेहमीच उत्तर देतो असेही नाही. माझी बरीच उत्तरे मोघम असतात. त्यातील हे एक उत्तर. […]

चोरी कृष्णाने केली दंड हि कृष्णाला मिळाला

न्यायाधीश, पेंद्या तुला चोरी करताना रंगे हात पकडले आहे. तू चोरी केली हे तू कबूल करतो का? न्यायाधीश महोदय, मी चोरी केली नाही. ‘करता करविता स्वयं भगवान कृष्ण आहेत’.  जे घडले ते भगवंताच्या इच्छेने.  शिवाय मी रोज सकाळी भगवंताची पूजा करताना आपल्या सर्व कर्मांची फळे भगवंताला अर्पित करतो. ॐ श्री कृष्णार्पणमस्तु.  मी चोरी केली हे जरी सिद्ध होत असेल तरीही त्या […]

माय मराठी

नुकताच ‘जागतिक मराठी भाषा दिन ‘ झाला अन आम्ही झोपेतून ( कि गुंगीतून ) सपाटून जागे झालो . “मराठी वाचवा ” असे आवाहन करण्यात आले . मराठीचा -बचाव -बचाव असा आक्रोश स्पष्ट एकू येवू लागला . आम्ही बेचॆन झालो . ‘मराठी वाचलीच पाहिजे ‘ (क्रिया आणि क्रियापद दोन्ही )याचा साक्षात्कार झाला ! […]

मद्यानंद

साडेतीन मोहर्तातला पहिला गटारी अमावस्या , दुसरा शिमगा , तिसरा एकतीस डिसेम्बर आणि अर्धा एक जानेवारी . या मोहर्तावर थोडी का होईना घ्यावी असे ‘पिता मह दत्तू मामा ‘ यांची आज्ञा आहे . तसेच या प्रसंगी एखाद्यास तरी त्याची ‘दीक्षा ‘ जरूर देऊन हा ‘सम्प्रदाय ‘ वाढवण्यास साहाय्य भूत ठरावे , असेहि त्यांनी प्रतिपादन केले आहे . ‘दीक्षांताचा ‘ विधी पण त्यांनी आपल्या ‘मद्यानंद ‘ ग्रंथात लिहून ठेवला आहे . तो येणे प्रमाणे . […]

प्रतिभावंत कवी, तत्त्वचिंतक विं.दा.करंदीकर

विंदा करंदीकर हे धालवली खारेपाटण ता. देवगड गावचे सुपुत्र, महाराष्ट्रातील प्रतिभावंत कवी, जेष्ठ लेखक, अभ्यासू आणि जाणकार समीक्षक, बाल नाटककार, संस्कृत आणि मराठी वाङ्‌मय गाढे अभ्यासक .एक चोखंदळ वाचक, विध्यार्त्यांचे मार्गदर्शक. असे अनेक पैलू असलेले व्यक्तिमत्व. विंदाच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, गांभीर्य आणि मिस्किलपणा आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजुक भावसौंदर्य यांचा एकदम प्रत्यय येतो..! […]

1 11 12 13 14 15 18
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..