एखादी स्मित रेषा
तसे बघितले तर स्मित व हास्य हे समानार्थी शब्द होत. स्मित हे हास्याचे सौम्य रुप झाले, ( तोंड न उघडतां, दांत न दाखवता गालांच्या थोड्याश्या हालचाली करुन ). नैसर्गिक रित्त्या चेहर-यावर जे समाधानाचे वा आनंदाचे मंद भाव येतात ते झाले ‘स्मित ‘. हास्य किंवा हसणे हे काही विषेश कारणाने चेहेर्यावर प्रकटते. विशेष कारणे जसे एखादा विनोद, कुणाची फजिती, मिळालेले यश, सहमती, कुत्सितपणा, समाधान वगैरे हास्याला कारणीभुत असु शकतात. […]