दाढावळ
माझ्या मित्राच्या घराण्यात कोणालाच अक्कलदाढ आली नव्हती. बातमी घराबाहेर लीक झाली आणि गावभर पसरत पसरत गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्डमधे पोहोचली. घराण्याचं पितळ उघड पडून होणारी नाचक्की टाळण्यासाठी मित्राच्या वडिलांनी मला मध्यस्थीची गळ घातली आणि मी गिनीज बुक वाल्यांना बातमी प्रसिध्द करण्यापासून थोपवायच ठरवल. […]