नवीन लेखन...

रामकृष्ण

मला आश्चर्य वाटायचं. सुखवस्तू आणि झोपडीतली माणसं,माणूस म्हणून सगळे सारखेच. आम्हाला जेवढं मिळतं ते कमीच वाटतं. त्या सुखाचे ही अनंत प्रकार. सगळंच हवं असतं. आणि हा रामकृष्ण, इतके वय झालेला. अजून कष्ट करतो तेही विनातक्रार.आला दिवस कसा जाईल अशा परिस्थितीत हा इतका संतुष्ट कसा? […]

यशोशिखरांकडे नेणारी प्रेरणेची पायवाट

कुणाची तरी प्रेरणा कुणाच्या तरी कामाला येते. जीवन जगत असतांना प्रेरणा कुणाकडूनही मिळते. प्रत्येकाचे प्रेरणा स्तोत्र ठरलेले असतात. कधी निसर्गातून कधी दुःखातून तर कधी माणसाकडून प्रेरणा मिळत असते. काही काही माणसांचे जीवन हाच संदेश असतो, जगण्यासाठी. […]

मंगलाष्टक : वरमाला

यासाठी केला होता अट्टहास असे बिरुद या सोहळ्यास देण्यास हरकत नाही, असा महत्वाचा विवाहसंस्कार लग्नविधी म्हणजे मंगलाष्टक. मंगलाष्टकांशिवाय लग्न लागले हे शास्त्रसंमत होत नाही. आंतरपाटाच्या दोहोबाजूला रुबाबदार नवरा आणि अधोमुखी गौरवर्णा अलंकार पुष्पमंडित सालंकृत नवरी उभे असतात. पौराहित्य करणाऱ्या ब्राह्मणाच्या शात्रोक्त मंत्रोच्चाराने नांदी होऊन नातेवाईक देखील एकेक करीत पाच, सात मंगलाष्टकांमधून देवदेवतांना, निसर्ग देवतांना, पवित्र नद्यांना […]

‘पैठण’- धावती भेट

स्लीपर कोचच्या थंङगार वाऱ्यात आमचा प्रवास सुरु झाला. एव्हाना कधी सकाळ झाली आणि आम्ही औरंगाबादला उतरलो. आम्ही कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय, सीवूड, नवी मुंबईचे सभासद आणि उपाध्यक्ष देवळेकाकांनी बुक केलेल्या सुभेदार शासकीय विश्रामगृहात फ्रेश होऊन आम्ही कारने पैठण नगरीत निघालो. […]

‘तमासगीर’ पु. लं. – स्वरतीर्थ

एकदा एका लावणीच्या कार्यक्रमाला पु. ल. देशपांडे यांनी हजेरी लावली होती. कार्यक्रम संपल्या नंतर सभागृहात लावणी कलावंताने पुलंना म्हटलं… ‘‘तुम्ही बी तमासगीर हायसा नव्हं!’’ तेव्हा पुलं उत्तरले, ‘एखाद्या कलाकाराने छानसं गायन केलं किंवा अभिनेत्याने नाटक सादर केलं किंवा नतर्कीने नृत्य साकारले, वादकाने सुमधुर वाद्य झंकारले तर त्याला परफॉर्मन्स आर्टिस्ट म्हटल जात, तर त्याच ताकदीने लावणी सादर […]

मिसळमॅच

संगीतामधे शब्दामधून अर्थ समजतात तर सुरांमधुन भावना प्रकट होतात. सुरांच्या अंगाने शब्द गुंफले तर शब्दाच्या अर्थछटा सुस्पष्ट सुरांच्या साथीने संगीत प्रगल्भ होते. तस्सच, फरसाणाच्या अर्थपूर्ण शब्दांमधे तर्रीच्या झणझणीत भावना जुळून आल्या की मग काय विच्चारता! […]

खच्चीकरणाची पंचवीस वर्ष

येणाऱ्या जानेवारीत मुंबईतील गिरणी कामगारांच्या ऐतिहासिक संपाला ३९ वर्ष पूर्ण होतील. या संपाला २५ वर्ष झाली (१८ जानेवारी २००७) तेव्हा संवेदनशील लेखक जयंत पवार यांनी महाराष्ट्र टाईम्समधे लिहिलेला लेख त्यांच्या परवानगीने खाली उद्धृत करत आहे. […]

तो निर्मळ आनंदी‘आनंद’ आहे म्हणून

आयुष्य हे अष्टकोनी आहे असे गृहीत धरले तर माझी आजी, हिंदी सिनेमा,क्रिकेट, जयवंत दळवी,(महाराष्ट्र टाईम्ससहीत) विवि करमरकर, शिरीष कणेकर,मेधा (त्यासोबत मुलगी अक्षता हा कोटीकोन आणि नातू ईवान हा लघुकोन आलाच) आणि आनंदची मैत्री हे माझ्या आयुष्याचे आठ कोन आहेत. मराठेसरांची भूमिती काहीही म्हणो पण हे आठही कोन माझ्यासाठी विशालकोनच आहेत. यांतील एकही कोन जर माझ्या आयुष्यात […]

पाश हे गुंतलेले

आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे… भैरवीला, आप्पा ठाकूरांच्या सुप्रसिद्ध गजलेच्या ओळी दस्तुरखुद्द आप्पांच्याच करारी वाणीतून, कानावर पडताच श्रोतृवृंदातून जोशपूर्ण टाळ्यांचा एकच गजर होत ‘गुंतलेले पाश’ हा लालित्याने नटलेला कार्यक्रम संपन्न झाला आणि प्रेक्षकांमधून आज भरून पावलो अशी लखलखित प्रतिक्रिया उमटली. दिनांक २४ नोव्हेंबर २०१८ रोजी ‘बांधण जनप्रतिष्ठान’ आणि मराठी साहित्य […]

कारण ते एकमेवाद्वितीय होते म्हणून

ज्याचे कुणी नसते त्याचा हिंदी सिनेमा असतो. स्वतःच्या घरापेक्षाही थिएटरच्या अंधाऱ्या घरात जास्त सहजतेने वावरणाऱ्या,तेथील मिट्ट काळोखात आपल्या मनातील काळोख बेमालूमपणे मिसळणाऱ्या आणि समोरच्या चौकोनी सेल्युलॉइडच्या तुकड्यावर जीव लावणाऱ्या कडव्या पण असंघटित फिल्लमबाजांचा शिरीष कणेकर हे बुलंद आवाज होते.
‘आम्ही शिर्डीला जाणाऱ्यांना हसत नाही. […]

1 2 3 303
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..