नवीन लेखन...

अंदमान यात्रा दैनंदिनीचे पान

दुपार झाली.रात्रीचे जागरण झाले होते तरी सर्वजण उत्साहात होते.बस आता सेल्युलर जेल च्या दिशेने निघाली होती.भोवतालचा परिसर निसर्गरम्य होता.मधेच कुठे वळणावर दिसणारा समुद्र शांत असल्याचे जाणवत होते.त्याचे भयकारी स्वरूप कसे असेल.मला त्सुनामी आठवली.पण यावेळी तिची आठवणही मी दूर भिरकावली. […]

संकल्प बायकोशी न भांडण्याचा

मी तसे अनेक संकल्प कुठलाही नशापान न करता करतो.नशा न करण्याचाही संकल्प मी तसाच केला होता.परंतु माझा कोणताही संकल्प सिद्धीस जात नाही.मोठे संकल्प जाऊ द्या अगदी छोटे संकल्प देखील तडीस जात नाहीत.माझा मूळ स्वभाव संकल्पाच्या आड येतो. […]

कठडा

शहराच्या मध्यवर्ती भागात गोलाकार तळं. तळ्याभोवती बसण्यासाठी कठडा. कठड्याला लागून, तलावाच्या परिघात पादचारी मार्ग उर्फ जॉगिंग ट्रॅक. सकाळी आणि संध्याकाळी परिसर अगदी गजबजून जायचा. कोणी फेरफटका मारायला येणारे, कुणी व्यायाम म्हणून चालायला-पळायला येणारे. गप्पा मारायला येणारे ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळी, काही प्रेमी युगूलं आणि असे बरेच. “तो” सुद्धा रोज संध्याकाळी एक तास चालायला यायचा. […]

पतंग

संक्रांतीचा दिवस असतो. एक आई आणि तिचा लहान मुलगा घराच्या गच्चीवर पतंग उडवायला जातात. आईने मुलासाठी छान रंगीत पतंग आणलेला असतो. मांजा बांधून आई आणि मुलगा पतंग उडवायला लागतात. […]

लेडिज बायकांचं शॉपिंग

लेडिज बायकांचं शॉपिंग हा खरं तर फार गहन विषय आहे . आणि त्या विषयांचं शास्रीय अंगाने विस्लेषन झालं पाहीजे. म्हणजे मराठीत सांगायचं तर साईंटीफीक अॅनालिसिस झालं पाहिजे असं मला वाटतं. […]

शेवंती

एक पती पत्नी कायद्याने विभक्त झाले होते. आता त्यांचे रहाते घर त्यांच्या कामाचे नव्हते. ती तिच्या आई बाबांकडे निघून गेली. याला ते घर विकून दुसरे घर घ्यायचे होते. त्या घरातल्या आठवणी त्याला पुसून टाकायच्या होत्या. […]

9 x 1 = 7

एका शिक्षिकेचा वर्गावर क्लास चालू होता. आज ती मुलांना काहीतरी नवीन शिकवणार होती. तिने नऊचा पाढा फळ्यावर लिहायला सुरुवात केली. तो असा : 9×1 = 7 9×2 = 18 9×3 = 27 9×4 = 36 9×5 = 45 9×6 = 54 9×7 = 63 9×8 = 72 9×9 = 81 9×10 = 90 शिक्षिका फळ्यावर लिहित […]

सराव

एका मैदानात तिरंदाजीचा खेळ चालू असतो. एका विशिष्ठ तिरंदाजाचे कौशल्य सराहनीय असते. सगळे लोक त्याची वाहवा करत असतात. त्या घोळक्यातला एकच माणूस प्रत्येकवेळी म्हणत रहातो “हा तर सरावाचा भाग आहे. ‘ […]

हिरा है सदा के लिये

असं म्हणतात, पैसा पैशाकडेच जातो.. तसाच हिरा हिऱ्याकडेच जातो, असेही म्हटले तर?धोनीने २०११ चा वनडे वर्ल्डकप जिंकल्यावर या क्षणाची वाट पाहत १३ वर्षे गेली. वनडे वर्ल्डकप आपण सचिनसाठी जिंकत आहोत, ही भावना तेव्हा जवळपास प्रत्येक खेळाडूच्या मनात होती. आज T20 वर्ल्डकप जिंकतानाही भारतीय टीमला असेच काहीसे जाणवले असेल. ८ महिन्यांपूर्वीही ती संधी आली होती. पण… असो. […]

ओझे

एक लहान मुलगी एका ऊंच पहाडावर चढत असते. तिचे घर त्या पहाडाच्या पलिकडे असते. तिच्या पाठीवर एक लहान मुलगा असतो. पहाड चढायला फार कठीण असतो. […]

1 8 9 10 11 12 300
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..