नवीन लेखन...

शिक्षित आणि सुशिक्षित

मनात आलं .. हे आपले पद आणि पदव्या मिरवणारे शिकलेले असतील , सावरलेले नव्हेत. इतरांना सावरून घेणे ज्यांना जमते त्यांना सावरलेले म्हणावं. हे प्रचंड शिक्षित असतील पण सुशिक्षित निश्चितच नव्हेत. […]

सूप

धान्याला सूप… धान्य निवडणे. फटके मारून फोलपट दूर करणे म्हणजे प्रत्येक वेळी स्वच्छता महत्वाची असते. हे काम तिलाच करायचे आहे. चांगली गोष्ट निवडावी पारखावी खडे रुपी दुर्गुण अलवार पणे दूर करावेत. मनातील वाईट विचार फटकारुन सगळ्यांची मनं स्वच्छ करायला लागतात… […]

अनोळखी दिवस

वडील आर्मीत नोकरीला होते. त्यामुळे वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत आमचे कॅम्पच्या शाळेत शिक्षण झाले. त्यांची शिस्त अंगी बाणली. ते जिवनच वेगळे होते. त्यामुळे बाहेरच्या जगाची काहीच कल्पना नव्हती. […]

बोल मित्रा !

हे संबोधन मी १९८२ पासून ऐकत आलोय. बजाज ऑटो मधील एका गुरुवारच्या सुट्टीत आम्ही मित्र-मित्र गेलो होतो बालगंधर्वला ! तेथील कलादालनात “काव्य-चित्र ” प्रदर्शन अशी पाटी दिसली म्हणून आम्ही उत्सुकतेने घुसलो. अनेक नामवंत मराठी कवींच्या काव्य ओळींचे चित्रातून हृदगत मांडलेले दृष्टीस पडले. हा प्रकारच अनोखा होता आणि काव्याचे असे interpretation आम्हांला नवे वाटले. […]

माझंच खरं

माणूस जन्माला येतो तेव्हापासून तो मोठा होऊन कर्ता पुरुष होईपर्यंत, त्याचं कुटुंबातील सर्वजण ऐकत असतात. त्यावेळी तो म्हणेल ते ऐकणाऱ्यांचं प्रमाण, हे १००% असतं. त्यात कुणाचीही भागीदारी नसते. त्याला घरात मानाचं स्थान असतं. आई-वडिल, भाऊ-बहीण त्यांच्या म्हणण्याला मान देत असतात. […]

मूर्तीपूजा : विविध धर्मातील फरकाचा एक मुद्दा !

मूर्तीपूजा ही पंचेद्रियांवर अवलबून असलेल्या माणसाच्या आकलनशक्तीची अगतिकता आहे. मूर्तिपूजक आणि मूर्तिभंजक या दोघांनीही जर हे सत्य समजावून घेतले तर दोघेही त्या विश्वनिर्मात्याची उपासना वेगवेगळ्या पद्धतीने करतानाही परस्परबंधुभाव सांभाळू शकतील. एवढेच नव्हे तर तो वृद्धिंगतही करू शकतील. […]

सर्वसामान्यांचा जीवनोत्सव

सोलापुरात असताना आधी “रजनीगंधा ” आणि नंतर ” छोटी सी बात ” पाहिला. मध्यम वर्गीय प्रमुख पात्रे – विद्या आणि अमोल ! बसने प्रवास वगैरे करणारे, कपडेलत्तेही आपल्यासारखे . धर्मेंद्र आणि हेमाच्या सिनेमाला (आपल्यासारख्या आवडीने) जाणारे आणि त्यांच्या जागी स्वतःला कल्पणारे. […]

जादूगार रघुवीर

जादूगार रघुवीर यांनी, त्यांच्या एकूण कारकिर्दीमध्ये ७,०२३ जादूचे कार्यक्रम केल्यानंतर १९७७ साली निवृत्ती स्वीकारली. त्याआधी त्यांनी १९६७ साली, भिकारदास मारुती जवळ ‘जादूची शाळा’ नावाचा, वरती जपानी पॅगोडा असलेला तीन मजली बंगला बांधला. तिथे जादूचे प्रयोग शिकविणारी संस्था सुरु केली. देशातील व परदेशातील कित्येकांनी इथे जादू शिकून घेतली. […]

साठवणीतील एक आठवण

आषाढी एकादशीच्या दिवशी शाळेतील लहान मुले. मुली आणि पालखी सोहळा केला गेला होता. दरवर्षीच करते ती. छोटेसेच विठ्ठल रखुमाई. आणि वारकरी होते. त्यांनी वारकऱ्यांचा पोषाख केला होता. मुलींनी डोक्यावर तुळशीचे वृंदावन आणि मुलांनी हातात पताके व गळ्यात टाळ घालून ठेक्यात वाजवत नाचत अगदी तल्लीन होऊन परिसरात मोकळे पणाने जात होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला माणसं उभी होती. लहान पालखीला व वारकऱ्यांच्या पाया पडत होते. त्यांना पाहून मला वाटले होते की या छोट्यांना ना प्रपंचाची चिंता ना देवाजवळ काही मागणे. खरी तर हीच वारी व हीच खरी भावभक्ती. […]

रम्य ते बालपण : चंद्रशेखर ओक

‘लहानपण देगा देवा, मुंगीसाखरेचा रवा’ संत तुकाराम महाराजांनी किती यथार्थपणे म्हटले आहे. खरंच बालपण किती रम्य असतं याची जाणीव आपणास काळाच्या ओघात जात असताना पदोपदी होत असते. […]

1 98 99 100 101 102 302
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..