चैत्राची चाहूल (असाही एक वसंतोत्सव)
वसंत ऋतूची हीच तर गंमत आहे. निसर्ग साद घालतो आणि बाहेरच्या पानगळी बरोबर आपला आळसही गळून जातो. कोणत्याही झाडोऱ्यात फांदी हलली की स्थिर होऊन पहावे. कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाचे बागडणे अव्याहतपणे चालू असते. हीच माझ्या बागेभोवतीच्या चैत्रबनातून जाणवणारी चैत्राची चाहूल. हाच माझा वसंतोत्सव. […]