पहिलीपासूनचे सोबती
माझ्या वडिलांनी मला पहिलीसाठी भावे प्राथमिक शाळेत घातले. तेव्हा माझ्या हातात पहिले पुस्तक आले ते ‘बालभारती’चे! त्यावरील दीनानाथ दलाल यांनी काढलेले ‘मुला-मुलीचे पुस्तक वाचताना’चे रंगीत चित्र माझ्या डोक्यात, फिट्ट बसले! त्या छोट्या पुस्तकाच्या आतीलही रंगीत चित्रे, दलालांचीच होती.. मोट चालवणारा शेतकरी.. झाडाखाली बसून भाजी-भाकरी खाणारा शेतकरी.. खेळणारी मुलं.. बाहुली हातात घेतलेली मुलगी.. इथंच माझ्या मनावर त्यांच्या, अप्रतिम चित्रशैलीचा पगडा बसला.. […]