नवीन लेखन...

हृदयांतर

भाषांचे, उच्चारांचे, संकरांचे आपापले कप्पे असतात. शेजारची भिंत उडी मारून दुसऱ्या अंगणात पटकन घुसता येते, पण तेथे स्थिरावता येत नाही. आपली गांवे, गावकूस सांभाळणे आणि नंतर शक्य असेल तर उंबरा ओलांडणे हे श्रेयस्कर ! […]

मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेचा गौरवशाली इतिहास

ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला पां. के. दातार यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत.  […]

जागतिक हास्य दिन

जगातील कोणत्याही दोन हसणार्याम व्यक्तींमध्ये सहज मैत्री होऊ शकते. मग त्या व्यक्ती कोणत्याही देशाच्या, भाषेच्या, जातीच्या, धर्माच्या, वयाच्या का असेना. हास्य हे जगातील सर्वांशी मैत्री करून देणारे प्रभावी साधन आहे असेही आपण म्हणू शकतो. नेहमी हसा, हसत राहा आणि सर्वांना हसवत राहा……!!!! […]

स्वतःची टिमकी !

स्वतःच्या कर्तृत्वाचा,रोज करीत असलेल्या (भलेही ते किरकोळ का असेना) कामाचा सार्थ अभिमान बाळगणारे सदैव नमस्काराचे धनी असतात.जी मंडळी स्वतःच्या कौशल्याला ( ते कोणत्याही क्षेत्रातील असो) सतत धार लावून ते तीक्ष्ण करीत असतात त्यांनाही सलाम करण्यात काही गैर नसते. […]

लढा अथवा पळ काढा !

सध्याच्या २४x ७ न्यूज संस्कृतीने आपल्या प्रतिक्रिया/प्रतिसाद तसेच इन्स्टंट करून ठेवले आहेत.बरेचसे अननुभवी वार्ताहर पोरकटपणे हातात भ्रमणध्वनी आणि माईकचे नळकांडे घेऊन इतरांच्या आधी आणि खातरजमा न करताच सनसनाटी ब्रेकिंग ओकताना दिसतात आणि लगेच समाजमाध्यमांवर बरावाईट वर्षाव सुरु होतो… आपले सगळे निर्णय सध्या माध्यमे घेताना दिसतात. आपले शब्द,प्रतिसाद,कृती याबाबत खूप काळजी घेण्याची सध्या नको तितकी गरज निर्माण झालेली आहे. […]

चंद्रकोर.. मधुरा उमरीकर यांची कविता

जीवन हा सुख आणि दुःखाचा लपंडाव असतो असं म्हणतात.सुख दुःखाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी कवी किंवा कवयित्रींला लाभलेली असते.आजपर्यंत या चक्रातून कोणीही सुटलेला नाही.प्रत्येकाच्या वाट्याला कमी -अधिक प्रमाणात ते येतच असते म्हणून ज्ञानेश्वरापासून ते तुकारामापर्यंत आणि श्रीकृष्णापासून ते श्रीरामापर्यंत कोणीही या गोष्टीला कमी लेखलेले नाही. […]

हमने तुमको देखा

संपूर्ण “खेल खेल में ” महाविद्यालयीन जोशाने भरलेला ! हा, नीतू आणि राकेश रोशन – रॅगिंग , स्टेजवरील धमाका , थोडीशी रहस्य फोडणी , ” आजा मेरी बाहो में आ ” वाली अरुणा . बाहेर आलो तेव्हा खऱ्या अर्थाने तरुण झाल्यासारखं वाटलं. […]

‘अलविदा’ नसलेली ‘एक्झिट’ !

डोळ्यांनी बोलणारी फक्त दोन माणसं मला या चित्रपटसृष्टीत आवडली – एक तो “निळ्या डोळ्यांचा जादूगार “(राज कपूर )आणि दुसरा हा! मराठीतला आपला चपखल शब्द वापरायचा तर हा “भोकरडोळ्या ” होता. पण इतकी बोलकी नजर अपवादात्मक ! त्याचे सारे संवाद ओठातून नंतर उमटायचे पण ते काम आधी डोळ्यांनी केलेलं असायचं. […]

माझं माझं दुःख !

दुःख वाटल्याने कमी होतं म्हणे ! हेही पटत नाही. माझ्याकडचं एक किलो दुःख चार जणात वाटल्याने ते प्रत्येकी २०० ग्रॅम ( मी धरून पाच ) होत नाही. माझ्यासाठी ते एक किलोच राहतं आणि प्रदीर्घ काळ टिकतं . नवं दुःख आलं म्हणजे जुनं विसरलो असं होत नाही. ते सतत असतच आणि एकाकी असताना नव्याने, पूर्ण शक्तीनिशी भिडतं. […]

घटनेच्या पृष्ठभागाखाली

ख्रिस रॉक आणि विल स्मिथ यांच्यातील ऑस्कर सोहोळ्यातील “देवाण -घेवाण ” दिसलीच असेल दूरदर्शनच्या पडद्यावर ! रॉकने स्मिथच्या पत्नीबाबत खुलेआम एक शेरेवजा विधान केले. त्याबदल्यात व्यासपीठावर जाऊन स्मिथ ने त्याला थोबाडीत दिली. याही घटनेच्या तळाशी काहीतरी शिकवून जाणारा धडा आहे. वरवर न्यायाधीश बनून निकाल देण्याच्या आपल्या (भोचक, अनाहूत) सवयीच्या पलीकडे जाऊन आपली “समज” खोल करणारे काही हाती गवसतंय का हे पाहणे आपल्याला प्रगल्भ करत असते. […]

1 105 106 107 108 109 302
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..