दूरदर्शनी बातम्या
दूरदर्शन सुरु झाल्यावर आम्ही ‘अपट्राॅन’ कंपनीचा कृष्णधवल पोर्टेबल टीव्ही घरी आणला होता. त्याकाळी संध्याकाळच्या बातम्या आवर्जून बघितल्या जात असत. तेव्हा वासंती वर्तक हमखास दिसायच्या.. टिपिकल साडी आणि नाममात्र मेकअपमुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व खुलून दिसायचं. त्याआधी मित्रांच्या घरी जाऊन टीव्ही बघताना, भक्ती बर्वे, स्मिता तळवलकर यांना बातम्या देताना अनेकदा पाहिलेलं होतं. […]