व्हरक्याच्या मांडवाखालचा गारवा….
घराच्या अंगणात चार डिळ्या (खांब)रोवले जायचे त्याच्यावर उभे आडवे लाकडं बांधून त्यावर पळसाच्या पानांचं दाट आवरण असायचं.. या मांडवाखाली एवढं गार वाटायचं की आमचं सगळं कुटुंब पावसाळ्याची चाहूल लागेपर्यंत तिथेच असायचं.या मांडवावर टाकण्यासाठी पळसाची पानं असायची त्याला आमच्याकडे एक विशिष्ट शब्द होता,त्याला ‘व्हरका’ असं म्हणायचे… […]