माझे माहेर
‘माझे माहेर’ या दोन शब्दात किती प्रेम, माया, आपुलकी, अणि आदर सारं काही भरुन राहीलं आहे. बहिणाबाई चौधरी यांनी त्यांच्या ‘मन’ या कवितेत म्हटलंच आहे की ‘मन वढाय वढाय जसं पिकातलं पाखरु, व्हत आता भुईवर गेलं क्षणात आभायात ‘ त्यांनी म्हटल्याप्रमाणे मन एका क्षणात जसं जमिनीवरून आभाळात जात अगदी तस्सच माझं मन एका क्षणात अलिबागला पोचतं. […]