नवीन लेखन...

अनवट पर्यटन – (उगवता छत्तीसगड – १)

मध्य प्रदेश राज्यातील दहा छत्तीसगढी आणि सहा गोंडी भाषिक दक्षिण-पूर्व जिल्ह्यांचे विभाजन करून १ नोव्हेंबर २००० रोजी छत्तीसगड या राज्याची स्थापना झाली. रायपुर हे छत्तीसगड राज्याचे राजधानीचे शहर. छत्तीसकिल्ले असलेले राज्य म्हणून ह्या राज्याला छत्तीसगड असे नांव दिले. ह्या प्रदेशाचा इतिहास रामायण, महाभारत काळापासून होता. वैदिक आणि पौराणिक काळापासून छत्तीसगड अनेक संस्कृतीच्या प्रगती आणि विकासाचे केंद्र होते. येथील पुरातन मंदिरे आणि त्यांचे अवशेष असे दर्शवित आहेत की वैष्णव, शैव, शक, बौद्ध संस्कृतीचा विविध काळात ह्या प्रदेशावर प्रभाव होता. […]

रंगीबेरंगी

श्रावणात येणारी नागपंचमी. पावसाळ्यात सगळीकडे उत्साह ओसंडून वाहत असतो. आणि लेकींना माहेरची ओढ लागते. पंचमीचा सण येईपर्यंत खूपच वाट पहात असते. माहेरी गेल्यावर तिचे अल्लड वय. झाडांना बांधलेले झोके. त्यावर बसून गाणी म्हणते उंच माझा झोका. […]

सुरा मी वंदिले

सदाशिव पेठेत असताना घरात रेडिओ नव्हता. समोरच्या जबरेश्वर हाॅटेलमध्ये बुधवारी ‘बिनाका गीतमाला’ हा कार्यक्रम मोठ्या आवाजात लावला जात असे. तेव्हा अमीन सयानीच्या टिपीकल बोलीतून दहापासून पहिल्या ‘पायदान’पर्यंत एकेक गाणी ऐकलेला आशाताईंचा आवाज अजूनही कानात गुंजतो आहे. […]

गुरुदक्षिणा

गुरुकुल शिक्षण पद्धतीत शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरुंच्या आज्ञेनुसार विद्यार्थी स्वगृही जायचे. तिथे अध्यापनात सर्वांगीण विकास होण्याचे संस्कार केले जात असे. अशी ही एक पद्धत होती की गुरुकुल सोडून जातांना गुरुदक्षिणा दिली जायची. ती पण ऐच्छिक व ऐपतीप्रमाणे. […]

‘पाऊल’ आणि ‘पाय’

जेव्हा मराठीच्या अस्मितेबद्दल सांगायचे असते तेव्हा ‘मराठी पाऊल, पडते पुढे’ असे अभिमानाने आपण म्हणतो. दरवर्षी वारकरी आषाढीला पंढरपूरला पायी वारी करतात, तेव्हा त्यांच्या तनामनात एकच ध्यास असतो तो म्हणजे ‘पाऊले चालती, पंढरीची वाट..’ ती ‘पाऊलेच’ त्यांना विठ्ठलाच्या पायापर्यंत घेऊन जातात. […]

थेंब

सकाळच्या प्रहरी प्रसन्न होऊन अनवाणी पायांनी गवतावर चालताना दवबिंदू पायाला गुदगुल्या करतात आणि दिवसभर त्या जाणिवेचे हसु येतं. आळवावरचा थेंब पाहून बरेच जण बरेच काही अर्थ काढतात. शेवटी थेंबच आहे तो रुप लहान पण अर्थ महान. […]

‘किसन’ नावाचं अजब ‘रसायन’

किसनरावांच्या प्रत्येक भेटीत त्यांना असलेली सांस्कृतिक विषयांची आवड दिसून येत होती. साहित्य, संगीत, कला, नाट्य, चित्रपट, इत्यादी विषयांवर आमच्या गप्पा होत असत. भेटी होत होत्या. दरम्यान अप्पा बळवंत चौकात माईंनी ‘संस्कृती प्रकाशन’ची मुहूर्तमेढ रोवली. […]

केस भादरणे ते हेअर कटींग

घरातल्या मुलांसाठी तर त्यांना दर एक दीड महिन्यानंतर येण्याची standing instructionच दिलेली असायची. या बहुतेक नाभिकांचा पेहरावही सारखाच असायचा. काळी टोपी, अंगात बुशशर्ट आणि धोतर किंवा लेहंगा. हातात पत्र्याची वरून उघडणारी पेटी. […]

लेखणीतला, रूपया बंदा

पुनर्जन्मावर आधारित असलेले ‘नीलकमल’ व ‘मेहबूबा’ हे चित्रपट गुलशन नंदा यांच्या सर्वोत्तम लेखनाचे मानदंड आहेत. राजकुमार व मीना कुमारी यांचा ‘काजल’ हा भावना प्रधान चित्रपट सत्तरच्या दशकातील माईलस्टोन मानला जातो. १९७१ साली गुलशन नंदा यांची ‘झील के उसपार’ ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीने त्यांच्या आजपर्यंतच्या लोकप्रियतेचे रेकाॅर्ड तोडले.. तिच्या तब्बल पाच लाख प्रतींचा ‘न भूतो, न भविष्यती’ असा खप झाला! […]

एक घास चिऊचा एक घास काऊचा

तुकाराम महाराज म्हणतात भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान.. किती वास्तव सांगितले आहे ना. एरवी साधी चौकशी न करता मजेत जेवणारे पिंडदानच्या वेळी कावळ्याची वाट बघत बसतात. नाहीच आला कावळा तर दर्भाचा कावळा असतोच. चिऊ काऊचा घास खाऊन मोठी झालेली हे सगळे विसरून जातात. […]

1 118 119 120 121 122 304
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..