नवीन लेखन...

थंडी ‘मुंबईची’

काय गं ss आलीस का एकदाची ? वाटच बघत होतो तुझी केव्हापासून …. तुझा सहवास नेहमीच हवाहवासा वाटतो …. त्यासाठी वाट मात्र खूप बघायला लावतेस तू .. […]

मानसिक स्वास्थ्य, तथ्य आणि पथ्य….

मानसिक स्वास्थ्य आपल्या भावनात्मक, मानसिक आणि सामाजिक बाबींशी निगडीत असतं. आपण कसा विचार करतो, अनुभवतो आणि कृती करतो ? यावर ते अवलंबून असतं. अनेकदा नकळत आपल्या अंतर्मनावर ताण येत असतो, तो जाणवत नाही आणि म्हणूनच कळतही नाही. […]

रूहमें फासले नहीं होते !

आपल्या पाडसांपासून तात्पुरते/कायमचे दुरावलेले नव्याने जुनंच जगायला लागतात- रुहमें फासले नहीं होते ! “क्लब ६०” हा असा दुर्लक्षित शिक्षक ! वयाच्या उताराला लागल्यावर त्या टप्प्याचे शिक्षण देणारा !! […]

‘आवाजा’चा जादूगार

चित्रपटाचे संगीतकार नौशाद हे ट्रायल पाहून, तणतणत मंगेश देसाईकडे आले व ‘साले, साऊंड मिक्सींग करनेवाले, मेरे गाने का सत्यानास किया तुने xxxx’ असे आवाज चढवून भांडू लागले. मंगेशने देखील त्यांना वरच्या पट्टीतच उत्तर दिले, ‘थिएटर में देखना और बुरा लगे तो इधर वापस मत आना xxxx’ ‘पाकिझा’ चित्रपटाचा ‘प्रिमिअर शो’ पाहून नौशाद, मंगेश देसाईला भेटायला आले व अक्षरशः त्याला लोटांगण घातले. […]

कोण झोपला उन्हापर्यंत

नैराश्य आणि वैराग्य या दोन वेगळ्या वाटा आहेत, हे ज्याला समजलं तो आपल्या मानसिक स्थितीची योग्य फोड करून त्यावर काम करू शकतो किंवा त्याला सुस्थितीत आणण्याचे प्रयत्न करू शकतो. […]

सब कुछ सिखा हमने

कुणा कडे दुर्लक्ष करायचे. घासाघीस कुठे करायची. हे सगळे आम्हाला पण समजते. आमच्या काळी तर बाहेर जायचे नव्हतेच पण आम्ही मात्र मुलांना सातच्या आत घरात अशी समज दिली होती. […]

‘गगन विहार’ ओळखीचा! (माझी लंडनवारी – 33)

प्लेनच्या बाहेर आल्यावर थंडगार वाऱ्याने माझे स्वागत केले. मोकळा श्वास मन भरून घेतला. आणि जिना उतरून फ्रॅंकफर्टच्या जमिनीवर पाय ठेवला. मला नेहमीच पर-प्रांतीय भूमीवर पाय ठेवण्याचं फार कुतूहल होतं. वसुंधरा एकच, पण माती भिन्न, त्यात वाढणारे जीव वेगळे. त्यांची जडण, घडण वेगळी. त्या भूमीवर पाय ठेवताना असेच विचार मनात येत होते. ‘घटा-घाटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे’. तसेच काहीसे मला भूमीच्या बाबतीत वाटते. […]

तिसरी पोळी

मला पाहताच त्याने घट्ट मिठी मारली व आपल्या अश्रूंना वाट करुन दिली. मी त्याच्या पाठीवर थोपटत राहिलो. त्याच्या सुनेनं, आम्हा दोघांना चहा आणून दिला. त्याचा मुलगा कामासाठी बाहेरगावी गेला होता. शहराच्या उपनगरात प्रदीपच्या मुलाने प्रशस्त फ्लॅट घेतला होता. आमचं दुपारचं जेवण झालं. […]

भक्त हात जोडूनी उभा

भगवंताने आपल्याला वाईट आणि चांगलं असं असतं हे सांगितलं पण काय वाईट आणि काय चांगलं हे मात्र त्याने आपल्यावर सोडलं आहे. […]

पुनरागमनायच अर्थात London  once again! (माझी लंडनवारी – 32)

मी एकदम शॉकड्… जायचं हे माहित होतं. पण असं?  नीलम पुढे म्हणाली, तुझा पासपोर्ट, व्हिसा, तिकीट आणि करंन्सी तुला अटेंडंट एअर पोर्ट वर रात्री 12 वाजता आणून देईल. तू आत्ता फोरेक्स् कार्ड घे झेराकडून आणि घरी जाऊन तयारी कर. तसही तुझा पासपोर्ट येई पर्यंत 7- 8 वाजतील. […]

1 124 125 126 127 128 304
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..