ठाण्याची रंगपरंपरा
आज महाराष्ट्राच्या सह-सांस्कृतिक राजधानीचा मान मिरवणाऱया ठाणे शहराचा साधारणत सातव्या शतकापासून लिखित इतिहास आढळतो. या इतिहासात डोकावल्यावर लक्षात येते की, इतिहासकाळात ठाणे हे वैभवाच्या शिखरावर असलेलं, भरभराटीस आलेलं, व्यापारी उलाढालींचे आणि राजकीय हालचालींचे केंद्र असलेलं संपन्न नगर होतं. नाटकाच्या संदर्भातील पहिली नोंद मिळते ती रावबहादूर भास्कर दामोदर पाळंदे यांच्या संदर्भातील. ऑफिशिएटिंग मराठी ट्रान्सलेटर म्हणून सरकार दरबारी काम पाहिलेले पाळंदे साहित्यिक होते. ‘गीत सुधा’ आणि ‘रत्नमाला’ हे ग्रंथ त्यांनी लिहिले होते. मुख्य म्हणजे ‘विक्रमोर्वशिय’ या संस्कृत नाटकाचे त्यांनी मराठीत गद्य पद्यात्मक भाषांतर केले होते. तिथून ठाण्याची नाट्यपरंपरा उगम पावली, असं म्हणता येईल. […]