कोकणातील बंदरे
दाभोळ, जयगड, रत्नागिरी, रनपार, मुसाकाझी, विजयदुर्ग, देवगड, मालवण अशा सर्वच बंदरातून या प्रवासी आगबोटी येता जाता थांबत होत्या आणि प्रवाशांची बंदरांवर वर्दळही होती. त्याकाळी किनारपट्टीवरील लहान लहान खाड्यांमधून गलबते व मचवे गर्दी करून असत. रेशनवरील तांदूळ, गहु, जोंधळा अशा अन्नधान्यातून मीठ, लाकूड, मंगलोरी कौले अशा सर्व स्तरावरील मालवाहतूक लहान-मोठ्या बंदरांतून गलबतांद्वारे मोठ्या प्रमाणात होत असे. […]