ललित लेखन
माझा बाप शेतकरी
शेतकरी बाप…चारही पोर जन्माला आली ती कळती होईस्तोवर त्यांचं दवा पाणी, जर कळती झाली दोघे चालली एक मराठी शाळेत तर एक अंगणवाडीत दुसऱ्या दोघांचं आहेच ते दवापाणी..असच निसर्गाशी झुंझत करत, दिवसामागून दिवस, अन वर्षामागून वर्षे हळूहळू उलटतात,न अखेर तो दिवस उजाडतो जेव्हा पदरात जगासाठी धनाची पेटी असणारी कदाचित त्या बापासाठी पण…ती धनाची पेटी म्हणजेच बापाची बेटी जेव्हा उपवरात येते तेव्हा नकळत बापाच्या काळजात चर्रर्रर्रर्र होतं.. इथपर्यंतच शक्य होत मी केलं आता इथून पुढे मी काय करू?? असा हतबल झालेल्या बापासमोर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं. […]
माझ्या प्रोफाईल फुटुची गोष्ट
मी फेसबुकला कधीच माझा प्रोफाईल फोटो लावत नाही.. नाही..नाही..गैरसमज करून घेऊ नका..कोणी फोटोचा गैरवापर करेल असला विचारही माझ्या आसपास फिरकत नाही.कारण तसं करायला सुंदर तर सोडाच पण जरा बरा चेहरा लागतो..माझा तो आजिबात नाही.. दोन चार महिन्यांपूर्वी आपणही जरा बरं दिसावं असं उगीचच मनानं घेतलं..म्हटलं छानसा हेअर-कट केला तर कदाचित वय दोन-पाच वर्षे कमी दिसेल. म्हणून […]
बदलणारं अस्तित्व
तिच्या घरापासून थोडी लांब एक छानशी जागा होती. तिथे भरपूर आणि उंच झाडं, झाडांना लपेटलेल्या वेली, त्यावरील वेगवेगळ्या रंगाची, गंधाची फुलं आणि या सगळ्यावर मुक्त विहार करणारे, किलबिल करणारे पक्षी. या सगळ्या गोष्टी जेवढ्या ठळक तेवढंच त्यांच्या विरुद्ध असणारा एक डोहं ही होता तिथे. […]
जपानी सामुराई महिला-इटागाकी, हात्सू-जो, मियाजिनो आणि टोरा गोझेन
गजा पानमधील कॅमेलॉट सरदारांच्या फार पूर्वीच सामुराईंनी खानदानी लढवय्यांच्या वर्गाची एक श्रेणी निर्माण केलेली होती. सामुराई पंथात वा श्रेणीत समाविष्ट होण्यासाठी माणूस धष्टपुष्ट असणे, शिस्तबद्ध असणे आणि निर्भय असणे अत्यावश्यक होते. […]
तुमको न भूल पाएँगे- भाग १
कसं काय मंडळी मजेत ना?आणि आपला नेहेमीचा आपुलकीचा प्रश्न ” वाचताय ना? वाचायलच पाहिजे , कारण घेऊन आलोय तुमच्या आवडीचा कार्यक्रम उदय सप्रे म प्रस्तुत चला , { आनंदाने } जगण्याची दवा येऊ द्या ! { झी आणि डाॅ.नीलेश साबळेंची क्षमा मागून ! […]
बाळासाहेबांच्या स्वाक्षरीची बॅट
आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक आठवणी अनेकांकडे असतील. माझ्याकडे त्यांची अशी एक आठवण आहे जी कदाचित कोणाकडेही नसेल.. माझ्यासाठी ती अक्षरश: अमूल्य आहे. […]
शाळेचा पहिला दिवस
शाळेचा पहिला दिवस व्हता. मी चौथीतून पाचवीत गेलो .बापानं कशीतरी पदरमोडं करून वह्या पुस्तकं आणले व्हते. या सालापासून मव्हा भाऊबी शाळंत येणारं होता. मनून मंग बाच्या सांगण्यावरूनं मी त्यालं घेऊन शाळतं निघालो.एंक्याचा आज शाळचा पह्यलाचं दिवसं आसल्यानं पाहाटचं उठून आंघुळ करून त्ये सगळ्या देवायच्या पाया पडूनं आलतं. […]
आपण सुसंस्कृत मुखवटे घातलेले विकृत माणसं
वासुदेव, पिंगळा, पोतराज इत्यादी पात्रे मला कधीच संस्कृती वाटली नाही..उलट भटक्यांच्या पिळवणुकीची सांस्कृतिक व्यवस्थाच वाटत आलीय. […]