तेथे पाहिजे जातीचे
१७ व्या मजल्या वरील गच्चीच्या अठरा फूट उंचीच्या वीस वर्ष जुन्या ग्रीलच्या गंजलेल्या शिगा घासून साफ करणे , जास्त गंजलेले आडवे पाइप कापून काढणे , नवीन पाईप वेल्डिंग करून बसवणे आणि सगळ्याच ग्रील्स प्रथम प्रायमर मारून नंतर रंगवणे इत्यादी अत्यावश्यक कामे पावसाळ्यापूर्वी करून घेण्यासाठी अनेक स्थानिक फॅब्रिकेटर्सना मी संपर्क केला होता . […]