नवीन लेखन...

काँट्रॅडिक्शन

जहाजावर सहकाऱ्यांकडून (बऱ्याच वेळा पदाने वरिष्ठ) खाण्याच्या बाबतीत नेहमी येणारा अनुभव आणि एका स्टेशनवर पाहिलेल्या एका प्रसंगातील विरोधाभास. जहाजावर महिन्याला हजारो डॉलर्स किंवा एका हाताची पाचही बोटं मोजायला कमी पडावीत एव्हढे लाख रूपये पगार घेणारे सहकाऱ्यांची कीव वाटावी आणि वयाची एंशी ओलांडलेल्या एका गरीब आजीच्या हातातील घास पाहून मन हेलावणारा प्रसंग. शेळ्या मेंढ्या आणि गुर ढोरं गवत झाडाचा पाला आणि राखण नसलेल्या शेतातील भाजीपाला पीकं खातात. […]

जिवाला ओढ लावणारी “वर्षाअखेर!”

जाणार्‍या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षाला आनंदाने सामोरं जाताना , या वर्षांत जे जे धन आपण गमावलं ( माझ्यालेखी धन म्हणजे ही अमूल्य अशी माणसं! ) ते जरूर आठवा , त्यांच्या घरच्यांसाठी दोन हात परमेश्वरापाशी जोडा आणि म्हणा : Happy New Year ! […]

मराठी ग्रंथाभिमान

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाने मराठी ग्रंथांच्या अनुवादासाठी प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. अर्थात, राज्याच्या सांस्कृतिक धोरणाचा एक भाग म्हणून ही महत्त्वाकांक्षी योजना पूर्ण करण्याचे निर्देश शासनाने मंडळास दिले आहेत. त्यानुसार, ‘मराठीतील उत्तम साहित्यकृती अन्य भारतीय भाषांमध्ये विशेषतः हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये अनुवादित होण्यासाठी उपक्रम राबविले जातील. […]

शुभेच्छापत्रे

किती छोटीशी गोष्ट असते, शुभेच्छा देणं! शुभेच्छा मिळाल्या की प्रसन्न वाटतं… कुणाला तरी आपली आठवण आहे, याचा आनंद होतो. हुरूप येतो. राजकारणी लोक आणि व्यापार-व्यवसायातले शुभेच्छा देण्या-घेण्यात तरबेज असतात. मोठमोठी होर्डिंग्ज लावतात आणि शुभेच्छांच्या बदल्यात मोठमोठ्या हॉटेलमधून पार्ला देतात. […]

‘बर्थ कंट्रोल’ शब्दाची जननी मार्गारेट सॅनगर

लेडी ऑफ कॉन्ट्रासेप्शन’ किंवा ‘कुटुंबनियोजनाची जननी’ किंवा गरिबांची वाली म्हणून विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जगात सुप्रसिद्ध झालेली अमेरिकेतील महिला म्हणजे मागरिट सॅनगर! कुटुंबनियोजनासारखा तत्कालीन अश्लाघ्य विषय मागरिटने हाताळल्याने अत्यंत धाडसी आणि शूर महिला म्हणून तिची गणना साऱ्या विश्वात केली गेली आहे. […]

समाजव्रत

‘सत्यनारायणाचं व्रत’ हा अनेकांच्या भक्तिभावाचा विषय तर अनेकांच्या चेष्टेचा. देवधर्म, सणवार या गोष्टींतील निरर्थक रूढींकडेच ज्यांचं लक्ष जातं, त्यांच्या दृष्टीनं हा चेष्टेचाच विषय. पण अध्यात्माच्या गूढ चर्चेत रमणाऱ्यांच्या दृष्टीनेही हे ‘काम्य व्रत ! ‘ म्हणजे कमी महत्त्वाचंच एकदा कशावरून तरी विषय निघाला आणि मी म्हटलं, ‘काही गोष्टी खरंच कळत नाहीत हं. ‘ […]

माझा वाढदिवस

आज मी ७८ वर्षांचा झालो. म्हणजे ७९वे वर्ष सुरू झालं. ज्येष्ठ की वृध्द की जरठ म्हणायचं स्वतःला? पूर्वी म्हातारा पाहिला की शारदा नाटकांतल पद आठवायचं! ‘म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान.’ त्यांत दिलेला सर्व विनोदी तपशील नाही तरी कांही वर्णन तर आता या वयात लागू पडतंच. […]

पुस्तक मिटून ठेव

पुण्याच्या बुधवारपेठेतील भिडे वाड्यात १८४८ मध्ये जोतिराव फुले यांनी मुलींची शाळा उघडली, स्वतंत्रपणे मुलींची शाळा काढणारे ते पहिले भारतीय, त्या काळात पुण्यातला एक एक सनातनी ब्राह्मण म्हणजे ‘आरडीक्स पेक्षा महाभयंकर होता. सनातनी खवळले. […]

बहुचर्चित अमेरिकन ऑपेरा गायिका मारिया कलास

अमेरिकेच्या ऑपेराविश्वात मारिया कलासचे नाव गायिका म्हणून श्रेष्ठ प्रतीचे मानले जाते. त्याचप्रमाणे तिचे व्यक्तिमत्त्वही बहुचर्चित आणि वादळी स्वरूपाचे ठरले होते. कलावंताचा भणंगपणा आणि भावनांची तीव्रता तिच्या स्वभावात होती. रागालोभावर ती ताबा ठेवू शकली नाही. […]

काय ब्वॉ?

‘नग’ म्हणजे ‘पोचलेला’ इसम किंवा ‘कॅरेक्टर’ किंवा ‘पात्र’ आणि कोकणची माणसं कितीही साधीभोळी असली आणि काळजात त्यांच्या भरली शहाळी वगैरे असली तरी एकेक जण म्हणजे ‘नग’ असतो. […]

1 19 20 21 22 23 296
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..