नवीन लेखन...

कारण येथे सर्वांना जिंकायचे आहे

स्पर्धेच्या या जगामध्ये माणूस स्पर्धक झाला आणि तो इतका बेभान झाला की त्याला कुठल्याही गोष्टीची काही घेणे देणे नाही , त्याला फक्त जिंकायचं आहे आणि ती जिंकणे त्याच्या आयुष्याचं ध्येय होऊन बसलेल आहे. इथल्या बहुतेक सर्वच स्पर्धेमध्ये माणूस निश्चितच जिंकणार पण खर्या आयुष्याच्या स्पर्धेमध्ये तो हरणार तर नाही ना ही भीती मात्र वाटते….. […]

ऑन टाईम डिलिव्हरी

आजकाल कोणतीही वस्तु विकत घेण्यासाठी घराबाहेर पडून बाजारात जावेच लागते असे काही नाही. आजच्या डिजिटल युगात टाचणी पासुन फ्रिज पर्यन्त जवळपास सर्व गोष्टी ऑनलाईन घरी मागवणे शक्य झाले आहे. अगदी हॉटेल मध्ये जाऊन जेवण्याची जरी इच्छा झाली तरी ऑनलाईन जेवणच घरी मागवणे शक्य आहे आज. […]

प्रतिभावंत शांता शेळके

परमेश्वर कोणाला भरभरून प्रतिभा देईल सांगता येत नाही.काही जणांना आपल्याकडे प्रतिभेच लेणं आहे याची जाण असते तर काहीना आपल्याकडे प्रतिभा आहे याची जाणीवच नसते. सुदैवाने शांताबाईकडे ह्याची जाणीव फार लवकर झाली. कॉलेज मध्ये असतानाच शांताबाई कवितेकडे वळल्या. […]

मृत्युंजय

मंत्रोच्चारयुक्त जप हा झाला आध्यात्मीक उपासनेचा एक भाग.मनुष्य जेव्हा रोग व्याधींनी त्रस्त होतो तेव्हा त्याला कोणाच्या तरी आधाराची गरज भासते व तो दैवी शक्तीच्या उपासनेकडे वळतो.आपणास आरोग्य देतो “सुर्य “व मारक शक्ती ही त्याचाच पुत्र “यम “याकडे असते.त्या दोघांचा कर्ता शिव.म्हणुनच त्यांच्या कृपेच्या अपेक्षेत गायत्री व मृत्युंजय मत्रांचे अनन्य महत्व आहे.मृत्यु अटळ असला तरी त्याच्या अनुषंगाने अवती- भोवतीच्या स्नेहजनांना येणार्या भितीवजा वलया ला सुसह्य करता आले तरी तो जणु मृत्यूवर विजयच म्हणजे “मृत्यूंजय” ह्या कल्पनेवर आधारित प्रस्तुत लेखात विद्यमान परिस्थीतीचा आढावा घेत विविध दृष्टीकोनांना हाताळीत, मृत्युनंतर काय ह्या प्रश्नचिन्हाला अलगद स्पर्श केला आहे. […]

बालकुमार साहित्य संमेलनाचे जनक – अमरेंद्र गाडगीळ

मुले हेच घराचे बहुमोल अलंकार ,मुले हीच राष्ट्राची खरी संपत्ती ,मुले म्हणजे देवाघरची फुले अशा अनेक घोषणा आपण आज पर्यंत एकात आलो आहोत. पण बालसाहित्य निर्माण करून मुलांच्या सर्वांगीण विकास होऊन वाचनाची गोडी निर्माण होण्याच्या दृष्टीकोनातून बालकुमार साहित्य चळवळ निर्माण करणारे थोर बालसाहित्यिक म्हणजे अमरेंद्र लक्ष्मण गाडगीळ ! […]

करायला गेलो एक

माझे ‘Culinary Skills’ कसे वाढत गेले ते ह्या प्रसंगातून कळेल. पंचवीस वर्षापूर्वी मी माझे बिर्‍हाड पॅरिसला थाटले होते. किचनमधुन ‘आयफेल टॉवर’ दिसत असे. रोजचे जेवण बनविणे सवयीचे झाले होते (ब्रेडच्या विविध प्रकारांनी मला आधार दिला). एका सुट्टीच्या दिवशी माझ्या डोक्यात रवा, साखर व तूप यांचा झिम्मा सुरू झाला व मी शीरा करण्याचा निश्चय केला. […]

मराठी लघुकथेचे जनक – ना. सी. फडके

मराठी साहित्यात कथा या प्रकारात अनेकांनी आपल्या लीलया लेखणीने खुमासदार शैलीतील कथा दीर्घ व लघु स्वरूपात साकारल्या. या पैकी मराठी लघुकथेचे स्वतंत्रयुग निर्माण करणारे सुप्रसिद्ध साहित्यिक म्हणजे ना. सी. फडके […]

माणसाचे जमिनीवर असणे

जीवनात चढ -उतार येतच असतात , सुखातल्या जीवाला संकटाची झळ बसते , तर दुखाने होरपळून गेलेल्याला सुखाची सुखद शीतल सावली  मिळून जाते. अशा नित्य बदलत्या प्रसंगात माणसाची एक प्रकारे परीक्षाच होत असते. भल्या भल्या माणसांना अशा वेळी स्वतःला नियंत्रित ठेवणे जमू शकत नाही, म्हणूनच आपल्या सभोवतालची असलेली मित्र मंडळी अपेक्षा करीत असतात की-  अशा बिकट  प्रसंगी […]

आदरणीय पारनाईक सर….

खरे तर आमच्या मो. ह. विद्यालयाची तुम्ही शान होता. अहो सगळेच शिक्षकाची नोकरी करतात आणि नोकरी करता करता फालतू राजकारणात गुंतून रहातात तसे तुम्ही केले नाहीत हे महत्वाचे तुम्ही शिक्षक होतात ‘ शिक्षक राजकारणी ‘ नव्हता हे महत्वाचे. कारण शिक्षक म्हटले की त्या छोट्या का होईना विश्वात राजकारण नावाची कीड घुसतेच , आता सगळीकडे घुसते , काळच बदलला आहे . […]

ज्ञात अज्ञात पंढरपूर १ – चंद्रभागा मंदिर

पंढरी क्षेत्राची नगर परिक्रमा करताना चंद्रभागा घाटावर चढून वर आले कि सुमारे ५० टाळकरी उभारतील एवढ्या दगडी सपाचे पश्चिम बाजूस पुर्वाभिमुख असलेले हे छोटे खानी पण सुंदर दगडी उत्तर पेशवाई थाटाचे मंदिर दिसते. शिखराची मोड तोड झालेली, भिंतींचा अन् शिखराचाही रंग उडालेला असे हे दुर्लक्षित अज्ञात मंदिर. मात्र दुर्दैवाने याची कुणाला माहितीच नाही. गावकऱ्याना हे मंदिर चंद्रभागेचे आहे हे ज्ञात नाही तर महाराष्ट्र अन् परराज्यातील गावोगावातून भक्तांना काय कळणार? […]

1 215 216 217 218 219 302
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..