नवीन लेखन...

आज आत्महत्या नाही का ?

समाज म्हणून आपण इतके निर्ढावलेलो आहोत की आपल्या समोर येणाऱ्या आत्महत्यांच्या घटनांचे आपल्याला काहीच वाटत नाही. अंगावरची घाण झटकावी इतक्या सहजपणे आपण या घटना वाचतो, ऐकतो आणि दुसऱ्या क्षणाला विसरुन जातो. […]

कल्हईवाला…

आज हे सारे आठवण्याचं कारण म्हणजे… घरातला शेवटचा पितळी तांब्या देण्यासाठी बाहेर काढला गेला होता. हा तांब्या मोडमध्ये देऊन स्टिलचे कुठलेतरी भांडे घेण्याची योजना आखली गेली होती. त्या पितळी तांब्याला पाहून कल्हईवाला चाचा आठवला. पितळी तांब्याला चिकटलेले सारे जुने संदर्भ आठवले आणि आठवणी समोर उभ्या ठाकल्या…. […]

आणि पारिजातक हसला !

त्याचं स्मितहास्य तुम्हालाही जाणवेल. पण त्या वेड्या पारिजातकाला हे माहीत नाही की , लॉक डाऊन मुळे त्याचं हे रूप त्याला पुन्हा प्राप्त झालंय. लॉक डाऊन संपल्यावर … बाप रे ! नकोच तो विचार … […]

आजी तुझी आठवण येते…

– एके दिवशी दुपारचा चहा झाल्यावर आजींनं सगळ्यांना एकत्र बोलावलं .बेडखालची बॅग बाहेर काढली आणि उघडली . म्हणाली , ” तुम्हाला वेळ कसा घालवायचा हाच मोठा प्रश्न आहे ना , मग मी आता या बॅगेतला सगळा भूतकाळ तुमच्यासमोर ठेवते . वेळ कसा जाईल ते तुम्हाला कळणार सुद्धा नाही . ” आणि मग इतके दिवस दडवून ठेवलेला मौल्यवान खजिना बाहेर काढावा , त्याला अलगद हाताळावा , तसं आजी एकेक वस्तू बाहेर काढू लागली . […]

नक्कीचं उजाडेल..!

आपण अनेक शंकासुराच्या काटेरी कुंपणातुन गेलो आहोतचं, पण थोडे आपले बोल असत्याच्या चौकातून सत्याच्या मार्गाकडे रममाण झाले तर थोडं लवकर नक्कीच उजाडेल…! […]

दगड

लोखंडाला परीसाचा स्पर्श झाला की त्याचे सोने होते अशी मान्यता आहे, हे लक्षात घेतल्यास दगडाचे देखील तसेच आहे. कारण एखाद्या साधारण दगडाला कोण्यातरी कलाकाराचा हात लागला तर त्यातून मुर्ती साकारते, वनवासात असताना रामाच्या स्पर्शातून अहिल्या प्रकटली होती. विठ्ठलाची मुर्ती आणि नामदेवाची पायरी दोन्ही दगडाच्याच ना. दोघांनाही भाविकांच्या मनात श्रद्धेचं स्थान…..
[…]

आपण सारे संजय…

दिव्यदृष्टीधारी त्या संजयाची आज आठवण होण्याचे कारण म्हणजे आपण सारे त्या संजयाची भूमिका आता वठवत आहोत… कसे… आधुनिक काळात सर्वांच्या सोयीसाठी आणि संवादाचे साधन म्हणून आपण सारे मोबाईलधारी झालेलो आहोत. हा मोबाईल म्हणजे आपल्या सर्वांची दिव्यदृष्टी. या मोबाईलच्या माध्यमातून जगभरात घडणाऱ्या घटना घडामोडींची माहिती क्षणात आपल्यापर्यंत पोहचते. […]

भिंत

माणुस जेव्हा गुहेतून, झाडांवरून रहाण्यासाठी इतर ठिकाणे शोधू लागला, त्यावेळी त्याने सर्वप्रथम वृक्षांच्या पानांचा वापर करून आडोसा तयार केला असवा, त्यानंतर बांबू, दगड, विटा, माती, चुना यांचा वापर करून भिंत उभारली असावी, असे इतिहास तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आदीम काळापासुन सुरू झालेला भिंतीचा हा प्रवास अलिकडच्या स्मार्ट भिंतीपर्यंत येऊन थांबलेला आहे. […]

नाम गुम जायेगा…

आता मुद्दा असा उरतो की लहानपणी आत्याने थाटात कानात सांगितलेलं… ते मुळ नाव कुठे गेलं… मुळ नाव राहते ते फक्त कागदावर… आपले संबोधन होतं राहते ते वेगवेगळ्या नावाने.. टोपण नावाने… आदराने.. विशेषणाने… आणखी बऱ्याच नावांनी… तीच आपली ओळख बनते.. राहते… कारण.. कुणीतरी म्हटलं आहे… […]

1 218 219 220 221 222 302
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..