नवीन लेखन...

मराठी भाषेचा अभिमान बाळगायलाच हवा !

कधीकाळी प्रथम क्रमांकावर असलेली आपली मायभाषा मराठी आपल्याच काही मूर्ख लोकांमुळे किंवा त्यांच्या मुर्खपणामुळे मागे पडली. ज्या भाषेत सर्वात जास्त साहित्यप्रकार आहेत, ज्या भाषेला सर्वात जुना इतिहास आहे, ज्या भाषेत १३० पेक्षा अधिक कलाप्रकार आहेत आणि ज्या भाषेला संतांचे बोल आहेत अशा आपल्या मराठी भाषेचा आपण अभिमान हा बाळगायलाच हवा . […]

प्रभो शिवाजी राजा – उत्तरार्ध

खरे तर शिवरायांबद्दल “अगदी थोडक्यात” असे काहीच लिहिता येणार नाही, परंतु लेखन सीमेची मर्यादा पाळणे हे देखील अनिवार्यच असते, म्हणून मला उमगलेले छत्रपती शिवाजी महाराज आपणा पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. खरं सांगू ! लेखनसीमेचे भय हे एक निमित्त पण अखंड महासागराला कधी कोणी ओंजळीत भरून घेऊ शकले आहे काय ?  […]

प्रभो शिवाजी राजा – पूर्वार्ध

शिवनेरी गडावर जन्म आणि रायगडावर अंतिम श्वास असा जन्म मृत्यूचा गडकिल्ल्याशी संबंध असणारे, अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जनमानसामध्ये शासनकर्त्याप्रती विश्वास निर्माण करणारे, कुशल प्रशासक, शत्रूलाही मोह पडावा अशी कर्तबगारी, स्वतःच्या गैरहजेरीतही राज्याचा कारभार सुरळीत चालेल अशी जरब बसवणारा एक करारी शिस्तबद्ध राज्यकर्ता, सर्वसामान्य जनता आणि राज्यकारभारी यांना एकाच न्यायाने वागवणारा एक न्यायप्रिय परंतु प्रसंगी कर्तव्य कठोर असा छत्रपती शासक म्हणजे शिवाजी महाराज. […]

माझा व्हँलेनटाईन

आज चार पाच दिवस झाले त्याची माझी भेट झाली नव्हती. तो कुठे गडप झाला होता काही कळत नव्हते. मन खूप अस्वस्थ झाले. खरे तर मी त्याच्या नादी लागतच नव्हते. सतत माझ्यामागे भुणभुण करून त्यानेच मला नादाला लावले. त्याच्यामुळे माझे मुलांकडे आणि घराकडे होणारे दुर्लक्ष, रोजची कामे पूर्ण होऊ न शकणे आणि डोक्यात सतत त्याचेच विचार असणे […]

संगीत राधामानस च्या निमित्ताने…

कलाकृतीचे भाग्य हेच म्हणायला हवे की एकाच लेखकाचे एक नाटक एकाच स्पर्धेत दोन वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या तारखांना सादर करणार आहेत . प्रत्येक संस्थेचे नेपथ्य वेगळे , संगीत वेगळे , दिग्दर्शन वेगळे असणार आहे . तीच ती पारंपरिक संगीत नाटके , तेच ते कथानक , तेच ते संगीत या पेक्षा वेगळी वाट शोधणाऱ्यांसाठी हा एक दिशादर्शक प्रवास आहे . […]

जीवनाचा रणगाडा

‘मुंबई ‘….. तीन अक्षरांचा शब्द. याच तीन अक्षरांमध्ये कितीतरी अमर्याद,खोल,अथांग,चिरायूशी,अखंड ,अविश्रांत असे  जीवन दडलेले आहे . प्रत्येक दिवशी नवे आव्हान  पेलून  सक्षम पणे  मार्गक्रमण  करण्याची  जिद्द  येथील  मनुष्याला  असते. […]

हरिप्रिया

संवाद लेखन हरिप्रिया १) प्रियकर:-तुला आठवते का?आपली पहिली भेट. १) प्रेयसी:-हो तर,का नाही आठवणार? २) प्रियकर:-मी तुला नेहमीच झाडाआडून बघायचो. २) प्रेयसी:- मला ते ठाऊक होतं रे ३) प्रियकर:-अन् तो दिवस उगवला . ३) प्रेयसी:-१५ऑगस्टचा ४) प्रियकर:-हो.तुझी तारखही लक्षात आहे ना!!!! ४) प्रेयसी:-मी कधीच विसणार नाही तो दिवस. ५) प्रियकर:- मी घाबरतच गुलाब दिला होता तुला. […]

सांजवेळ निवृत्तीची, विरक्तीची (ललित)

बऱ्याच दिवसांनी आश्रमात जल्लोषाचे वातावरण पसरले होते.आश्रमातल्या वयोवृद्ध कुटुंबात एका हिरमुसलेल्या ,मनाने खंगलेल्या दाम्पत्याचं स्वागत करायचं होतं सगळ्यांना. इथे आलेले वयोवृद्ध जेव्हा प्रथम या आश्रमात आले होते ,तेव्हा त्यांचीही अवस्था याहून वेगळी नव्हती .पण आश्रमाच्या स्वागत सोहळ्यानेच त्यांच्यात आमुलाग्र बदल घडवून आणला होता. उत्सवमुर्तींसाठी व्यासपिठावर आखिव -रेखिव अशा सुंदर खुर्च्या मांडलेल्या होत्या.सर्वत्र फुग्यांची सजावट करण्यात आलेली […]

यहा के हम है सिकंदर

तुम्ही म्हणाल काय हे लावलंय डबा पुराण. पण मला खरंच असं वाटतं खरंच त्या स्वयंपाकघरातील वस्तू गृहिणीच्या स्पर्शासाठी आसुसलेल्या असतील. एखाद्या मैत्रिणीला आपण फोन करतो, एखादीला नाही तेव्हा दुसरी म्हणते, ‘‘ती कशाला मला फोन करेल. ती तुझी खास.’’ तसंच हे डबे किंवा भांडी म्हणत असतील का एकमेकांना, ‘‘तू तिचा आवडता आहेस म्हणून तुलाच ती ऑफिसमध्ये घेऊन जाते. […]

एक ‘ ओरिजनल ठाणावाला ‘…..

जयंतीलाल ठाणावला एक नाव नव्हते तर खऱ्या अर्थाने ते ठाण्याचे भूषण होते, खरे ‘ ठाणावला ‘ होते. ठाण्याची तलावपाळी सर्वानाच माहीत आहे परंतु सध्या बोटींग क्लब समोरील चढण आहे त्यापासून पुढे दत्तमंदिर पर्यंतचा भाग लालबाग म्हणून ओळखला जातो, तेथील जयंतीलाल ठाणावला यांची प्रॉपर्टी होती […]

1 221 222 223 224 225 302
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..