अमेरिकेतला ख्रिसमस
सुमारे चाळीस वर्षांपुर्वीची गोष्ट..१९८१ साल असावं.मी पाचवी -सहावीत असेन.बहीण माझ्यापेक्षा बरीच मोठी.ती कॉलेजात होती. बहीण माझं रोल मॉडेल..ती जे करेल ते करायचं एवढीच त्या वयात अक्कल होती.त्यामुळे तिची पाठ मी सोडत नसे. ती कुठे जातेय या सुगाव्यावर मी असे..अन् तिला मात्रं त्या वयात मला घेऊन जायला लाज वाटायची..त्यांच्या त्या फुलपाखरीवयातल्या रेशमी गप्पागोष्टींत माझा अडसर व्हायचा.त्यामुळे ती […]