माझी जीवलग सखी
तशी अगदी लहानपणापासून म्हणजे मला समज आल्यापासून माझी ही सखी माझ्या सोबत होती. पण तीच आपली जीवश्च-कंठश्च सखी आहे हे माझ्या तसे उशीराच लक्षात आले. घरातील ग्रंथालय आणि विविध विषयांवरील पुस्तकांचा खजिना त्या सुकोमल,सदाबहार अशा माझ्या सखीला बहरण्यास मदत करत होता. ती माझी अगदी जवळची अशी खास मैत्रीण होती. ती सखी म्हणजे जणू एक प्रसन्न… चिरतरुण… टवटवीत आणि आनंदी असे सतत भिरभिरणारे फुलपाखरू. […]